शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गोवा सरकारला राज्यपालांकडून पुन्हा दणका, नवे राजभवन नकोच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 15:01 IST

राजभवनच्या विषयावरून राज्यपालांनी अतिशय स्पष्ट व रोखठोक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांना नवा धक्का दिला आहे.

पणजी - राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी यापूर्वी कोविड व्यवस्थापनाच्या विषयावरून सरकारचे कान पिळल्यानंतर आता नवे राजभवन बांधण्याच्या प्रश्नावरून सरकारच्या पाठीत धपाटा घातला आहे. राज्याची आर्थिक स्थिती अगोदर विचारात घ्या, नव्या राजभवनची गरजच नाही, असे राज्यपालांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रत म्हटले आहे. तसेच सद्यस्थितीत नवे राजभवन बांधणो हा अविवेकी विचार असल्याचेही राज्यपालांनी नमूद करून एक प्रकारे सरकारचे वैचारिक व हरणच केले आहे.गेल्याच पंधरवडय़ात मुख्यमंत्री सावंत व राज्यपाल मलिक हे कोविड व्यवस्थापन व वास्को लॉकडावनच्या विषयावरून आमनेसामने आले होते. आपण जे मिडियाविषयी बोललोच नव्हतो ते आपण बोललो असे मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना सांगितल्याचे राज्यपालांनी नमूद करून कोणताच सुसंस्कृत नेता असे दुस-याच्या तोंडी शब्द घालणार नाही असे राज्यपाल म्हणाले होते. त्यानंतर आता राजभवनच्या विषयावरून राज्यपालांनी अतिशय स्पष्ट व रोखठोक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांना नवा धक्का दिला आहे.27 जुलै रोजी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले व नव्या राजभवनची गरज नाही असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी काबो येथे नवे राजभवन बांधण्याचा प्रस्ताव चर्चेत आणला होता. समाजाच्या विविध स्तरांवरून त्यावर जोरदार टीका सुरू झाली. त्याची गंभीर दखल राज्यपाल मलिक यांनी घेतली व राज्याच्या आर्थिक स्थितीची जाणीव राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे. नवे राजभवन बांधण्याचा सरकारचा विचार अतार्किक तथा असंमजसपणाचा व अविवेकी आहे असे राज्यपालानी नमूद केले आहे. अगोदरच राज्य आर्थिकदृष्टय़ा वेगळ्य़ा स्थितीतून जात असताना राज्यावर आणखी मोठा आर्थिक बोजा टाकला जाऊ नये. कोणतेही नवे मोठे बांधकाम हे नवा आर्थिक बोजा टाकणारे ठरेल याची जाणीव राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली. तसे प्रसिद्धी पत्र राज्यपालांच्या सचिवांनी शनिवारी सर्व प्रसार माध्यमांना पाठवले आहे.राज्यपाल म्हणून माङो स्वत:चे काम करणो हे खूप मर्यादित आहे व मला नव्या राजभवन इमारतीची गरज नाही असे राज्यपालांनी सावंत सरकारला सुनावले आहे. जेव्हा कधी राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल तेव्हाच प्रकल्प उभा करता येईल व तो देखील राजभवनच्या सध्याच्या संकुलातच असेही राज्यपालांनी म्हटले असल्याचे सचिव रुपेश कुमार ठाकुर यांच्याकडून स्पष्ट केले गेले आहे.सध्या राजभवन बांधण्याचा प्रस्तावच नाही असे समजावे असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. नवे राजभवन बांधण्याचा सरकारचा विचार असंमजसपणाचा व अविवेकी आहे. अगोदरच राज्य आर्थिकदृष्टय़ा पेचात असताना त्यात नवे राजभवन बांधणो हे आणखी मोठा बोजा टाकणारे ठरेल. मला नव्या राजभवन इमारतीची गरज नाही.- राज्यपाल सत्यपाल मलिक

 

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार