शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून कामगारांची हेळसांड!

By admin | Updated: July 26, 2016 02:36 IST

पणजी : राज्यातील विविध अशा आठ कामगार संघटनांनी एकत्रित येऊन सोमवारी आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले.

पणजी : राज्यातील विविध अशा आठ कामगार संघटनांनी एकत्रित येऊन सोमवारी आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. तसेच गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे भाजप सरकार दुर्लक्ष करत असल्याने सरकारचा निषेध केला. शेकडो कामगारांनी एकत्रित येऊन आंदोलनात भाग घेतला. तसेच सरकारच्या किमान वेतन अधिसूचनेविरोधात गोवा आयटक, सरकारी कर्मचारी संघटना अशा पाच ते सहा संघटनांनी एकत्रित येऊन पाटो श्रमशक्ती भवनाजवळ निदर्शने केली. आझाद मैदान येथे एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केलेल्या संघटनांत क्रीडा खात्याचे कामावरून कमी करण्यात आलेले कंत्राटी कामगार, वेस्टर्न इंडिया शिपयार्ड लिमिटेड कामगार संघटना, अखिल गोवा पॅरा शिक्षक संघटना, १0८ रुग्णवाहिका कामगार संघटना, अखिल गोवा खनिज ट्रक ड्रायव्हर संघटना, डबल पार्ट टाईम शिक्षक संघटना, बालरथ कामगार संघटना आणि एका खासगी कंपनीच्या कामगार संघटनेचा समावेश होता. वेर्स्टन इंडिया लिमिटेड कामगारांचे दि. २0 पासून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला संघटनेचे तेरा कामगार दररोज उपोषणाला बसत होते. सरकार जोपर्यंत आमच्या मागण्यांवर लक्ष देत नाही, तोपर्यंत आम्ही लढा देत राहू, असे कामगारांचे म्हणणे आहे. संघटनेचे दोन कामगार विष्णू नाईक व अलेक्झांडर पाशेको हे आमरण उपोषणाला बसले आहेत. कामगारांच्या मागण्यांवर विधानसभा सुरू असताना कोणतेही निर्णय घेण्यात आले नाहीत तर जनआंदोलन उभारू आणि भाजपविरोधात जाण्याचा इशारा ट्रेड युनियन संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अजितसिंग राणे यांनी यावेळी दिला. श्रमशक्ती भवनासमोर निदर्शने दरम्यान, किमान वेतनाबाबत सरकारने हल्लीच अधिसूचित केलेली अधिसूचना कामगारांना अमान्य असल्याने ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी करत आयटकच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकारी कर्मचारी संघटनेपासून बँक खाते कर्मचारी संघटनेचे कामगार एकत्रित आले. श्रमशक्ती भवन येथे आयटकचे ख्रिस्तोफर फॉन्सेको, जॉन नाझारेथ, पुती गावकर, अ‍ॅड. सुहास नाईक इत्यादी कामगार संघटनेचे पुढारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)