शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बेरोजगारांना सरकार देणार रोजगार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 09:48 IST

पोर्टलवर नोंदणी सुरू; १५ जुलै रोजी नियुक्तीपत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यातील युवक युवतींना शिकावू तत्त्वावर एक वर्ष रोजगार देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत १० हजार जणांना सरकारी व खासगी क्षेत्रात शिकाऊ म्हणून नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारची कौशल्य विकास योजना गोव्यात लागू केली जात आहे. इयत्ता नववी ते पदवी शिक्षण घेतलेल्यांसाठीही ही योजना लागू आहे. नववी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी दरमहा ८ हजार रुपयांपासून चढत्या क्रमाने पदवीधरांसाठी दरमहा १३ हजार रुपये, असा प्रशिक्षण भत्ता देण्यात येईल. ही नियुक्तीपत्रे केवळ १ वर्षासाठी असतील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कौशल्य विकास योजनेंतर्गत या योजनेत केवळ एक वर्षांचेच काम दिले जाणार आहे. परंतु सरकारकडून हा कार्यक्रम निरंतरपणे राबविला जाणार आहे. त्यामुळे रोजगार पोषक वातावरणाची निर्मिती होईल आणि त्याचा फायदा हा निश्चितच होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या योजनेंतर्गत सरकारी क्षेत्रात ५ हजार व खासगी क्षेत्रात ५ हजार, अशा १० हजार नियुक्त्या केल्या जातील. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. https://www.appren ticeshipindia.gov.in या वेबसाईटवर हे अर्ज करावे लागणार आहेत. आपल्या शैक्षणिक माहितीसह सविस्तरपणे अर्ज सादर करावे लागणार आहेत. जागतिक युवा कौशल्य दिनी शनिवार, दि. २४ जूनपासून अर्ज केले जाऊ शकतात. त्यांची छाननी करून यशस्वी उमेदवारांना १५ जुलै रोजी नियुक्तीपत्र दिल्या जाईल.

विद्यावेतन असे

- ५ वी ते ९ वी ८ हजार रु.- १० वी ८ हजार रु.- १२ वी : १० हजार रु.- तांत्रिक किंवा व्यावसायिक प्रमाणपत्र ११ हजार रु.- तांत्रिक व्यावसायिक डिप्लोमा : १२ हजार रु.पदवीधर १३ हजार रु.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत