शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सरकार बेरोजगारांना भत्ता देणार नाही; रोहन खंवटेंचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:03 IST

सरकार बेरोजगारांना दरमहा भत्ता देणार असल्याचा काहीजणांचा समज झाला आहे.

पणजी : राज्यातील खऱ्या बेरोजगार युवा-युवतींमध्ये कौशल्य विकसित करून उद्योगांच्या माध्यमातून अशा युवा-युवतींना सरकार रोजगार संधी मिळवून देणार आहे. त्यांच्या वेतनाच्या खूप छोटय़ा भागाची जबाबदारी सरकार उचलणार आहे. बेरोजगारांना भत्ता न देता नवी योजना त्यांच्यासाठी राबवावी असे ठरले आहे. काही दिवसांतच या योजनेचे स्वरुप स्पष्ट करण्यात येईल. सरकार बेरोजगारांना दरमहा भत्ता देणार असल्याचा काहीजणांचा समज झाला आहे. सरकारने यावेळी मजूर व रोजगार खात्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुद वाढवली आहे. 24.87 कोटी रुपये रोजगार क्षेत्रासाठीच सरकारने ठेवले आहेत. यापैकी 2 कोटी रुपये हे रोजगार हमी योजनेसाठी आहेत. सरकार रोजगार हमी योजनेचा तपशील सध्या तयार करत आहे. या खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी शनिवारी 'लोकमत'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. खऱ्या बेरोजगारांना उद्योगांमध्ये किमान काम मिळावे याची जबाबदारी सरकार घेणार आहे. त्यासाठीच योजना आणली जात आहे. बेरोजगार युवकांना दरमहा तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य सरकार देईल, अशी चर्चा पसरली आहे. ती चर्चा चुकीची असल्याचे मंत्री खंवटे यांनी सांगितले. राज्यातील काही उद्योगांची मदत घेऊन सरकार युवकांमध्ये कौशल्य विकसित करणार आहे. त्यासाठी 3 कोटी 79 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेसाठी ही तरतूद असल्याचेही अर्थसंकल्पातून सरकारने स्पष्ट केले आहे. कौशल्य विकासासाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तरतूद सरकारने प्रथमच केली आहे. 2017-18 साली रोजगारासाठी अर्थसंकल्पीय तरतूद फक्त 4.73 कोटी रुपये होती. त्यामध्ये वाढ झाल्याने मंत्री खंवटे यांनीही समाधान व्यक्त केले.राज्यात बेरोजगारांची संख्या नेमकी किती आहे याची माहिती सध्या मजूर व रोजगार खाते गोळा करत आहे. रोजगार विनिमय केंद्राच्या यादीत असलेले सगळेच बेरोजगार नसतात. खरे बेरोजगार किती याची अधिकृत आकडेवारी मिळाल्यानंतर ही माहिती आधार कार्डशी जोडली जाणार आहे. अशा प्रत्येकाला सरकार उद्योगांच्या माध्यमातून मदत केली जाईल. दरमहा भत्ता न देता युवकांमध्ये कौशल्य विकसित करून त्यांना थोडे तरी काम दिले जाणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाjobनोकरीEmployeeकर्मचारी