पणजी : काँग्रेसचे जे नेते गोव्यातील भाजप सरकारविरुद्ध बोलत नाहीत, त्यांनी भाजपातच गेलेले बरे, अशा कठोर शब्दांत काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी सरकारबद्दल मोघम भूमिका घेतलेल्यांना फटकारले. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीतील चर्चेवेळी सिंग यांनी काँग्रेस नेत्यांना समज दिली. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो, विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे, आमदार विश्वजित राणे, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, पांडुरंग मडकईकर, बाबू कवळेकर, माजी आमदार बाबू आजगावकर, फिलीप नेरी रॉड्रिग्स व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बोलताना दिग्विजय सिंग यांनी नेत्यांची शाळा घेतली. एक दीड वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता जोमाने तयारीला लागण्याची गरज आहे. भाजपचे अपयश जनतेला दाखविण्यासाठी सर्व पर्यायांचा अवलंब केला पाहिजे. कोणतीही भीडभाड न ठेवता सरकारच्या कामाचा पंचनामा करण्याची गरज आहे. जे कुणी काँग्रेस नेते अजूनही सरकारविरुद्ध बोलायला धजत नाहीत, त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेले बरे, असेही त्यांनी ठणकावले. काँग्रेस हा राज्यातील विरोधी पक्ष असला, तरी विरोधी पक्षाची भूमिका निभावताना दिसत नाही. विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही सरकारविरुद्ध कडक भूमिका घेत नाही. पक्षाचे बडे नेते भाजपविरुद्ध काही बोलत (पान २ वर)
सरकारला घेरा किंवा भाजपात चला!
By admin | Updated: November 25, 2015 01:13 IST