शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकऱ्यांचे गोव्यात रॅकेट

By admin | Updated: September 16, 2014 01:22 IST

बनावट नियुक्तिपत्रे : मराठी कॉल सेंटर; महाराष्ट्र व गोवा सरकारचा संयुक्त उपक्रम असल्याचा बनाव

प्रवीण पाटील-पणजी : ‘नवसंजीवनी मराठी कॉल सेंटर’मध्ये नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक गंडा घालण्याच्या प्रयत्नात असणारे एक भले मोठे रॅकेट उघड झाले आहे़ महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या संयुक्त उपक्रमातून संजीवनी आरोग्य योजनेअंतर्गत हे कॉल सेंटर सुरू करण्यात आल्याचा बनाव करून त्यासाठी ‘टेलिफोन आॅपरेटर’ हवे आहेत, अशी जाहिरात फसवेगिरी करणाऱ्यांनी देऊन तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे़ अमोल महापुरे (ऐतवडे-खुर्द, जि़ सांगली), अमोल सुरडकर, शरद पवार (पद्मावती, जि़ जालना) या तरुणांना कॉल सेंटरचे नियुक्तिपत्रही दिले आहे़ या तिघांनी दिलेल्या माहितीवरून गोवा आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ़ जुझे. ओ़ ए़ डिसा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारचा कोणताही उपक्रम गोवा सरकार राबवीत नसल्याचे सांगितले़ महाराष्ट्र आरोग्य विभागाचे संचालक डॉ़ सतीश पवार यांनाही महाराष्ट्र सरकार असे कोणतेही कॉल सेंटर चालवत नसल्याचे सांगितले़ याप्रकरणाबाबत अमोल महापुरे म्हणाला की, २ आॅगस्ट एक जाहिरात वाचली, त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर नाव, पत्ता व शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती पाठवली़ ६ आॅगस्ट रोजी एका महिलेने फोन केला व दहा प्रश्न विचारले़ ८ आॅगस्ट रोजी दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा फोन करून त्या महिलेने काही प्रश्न विचारले़ उत्तरे दिल्यानंतर ‘काय जॉब आहे? काय करावे लागेल,’ अशी विचारणा केली़ त्यावर तुम्हाला लवकरच आम्ही सर्व माहिती पाठवू, असे सांगण्यात आले़ अमोल सुरडकर व शरद पवार यांनीही अशीच माहिती दिली़ काही दिवसांनी तिघांना पोस्टाने रजिस्टर एडी केलेले एक पाकीट आले़ त्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘संजीवनी आरोग्य योजना’चे मराठी कॉल सेंटर असे ठसठशीत अक्षरांत लिहलेले पत्र, संयुक्त सचिव सत्यपाल चौहान व खजिनदार सुनील तावडे नामक व्यक्तींच्या सह्या असलेले नियुक्तिपत्र, नवसंजीवनी मराठी चिकित्सा सेवा (कॉल सेंटर) असे शीर्षक असलेले माहितीपत्र होते़ कॉल सेंटरशी संबंधित महिलेने त्या तिघांना पुन्हा फोन केला व नियुक्तिपत्रावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून भारतीय स्टेट बँकेचा खाते क्रमांक घेण्यास सांगितले़ त्या खात्यावर अमोल महापुरे याला ११ हजार तर अमोल सुरडकर व शरद पवार यांना प्रत्येकी ८ हजार रुपये भरण्यास सांगितले़ ही रक्कम तुम्ही २४ तासांच्या आत भरा, अन्यथा तुमचा अर्ज बाद करण्यात येईल, असे सांगण्यात आले़ सरकारी नोकरी मग पैसे का भरायचे, असा प्रश्न पडलेल्या तिघांनी नियुक्तिपत्रावर दिलेल्या गोव्यातील पत्त्याची चौकशी केली असता पत्ता चुकीचा असल्याचे समजले़ तत्परतेमुळे अमोल महापुरे, अमोल सुरडकर व त्याचा मित्र शरद पवार हे आर्थिक फसवणुकीपासून सावध झाले़ मात्र, या कॉल सेंटरच्या माध्यमातून आणखी किती तरुणांना जाळ्यात ओढले आहे, हे चौकशीअंती समोर येईल़