शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी इस्पितळात पार्किंकसाठी तासाला २० रुपये, गोवा आरोग्य खात्याकडून आदेश जारी पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 22:03 IST

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणि इतर सरकारी इस्पितळाबाहेर  वाहने पार्किंगसाठी एका तासाला २० रुपये या दराने लोकांकडून शुल्क आकारले जाणार आहे. तसा आदेश आरोग्य सार्वजनिक अरोग्य खात्याकडून देण्यात आला आहे. 

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणि इतर सरकारी इस्पितळाबाहेर  वाहने पार्किंगसाठी एका तासाला २० रुपये या दराने लोकांकडून शुल्क आकारले जाणार आहे. तसा आदेश आरोग्य सार्वजनिक अरोग्य खात्याकडून देण्यात आला आहे. सरकारी इस्पितळात बिगर गोमंतकीयांकडून शुल्क आकारण्याच्या निर्णयाबरोबरच आता पार्किंग शुल्कही लागू करण्यात येणार आहे. अवर सचिव तृप्ती मणेरकर यांच्या स्वाक्षरीने तसा आदेश अरोग्य संचालनालय आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला जारी करण्यात आला आहे. प्रत्येक तासाला २० रुपये या दराने पार्किंग शुल्क आकारण्यात सांगण्यात आले आहे. हे शुल्क दुचाकीला, तिचाकीला की चार चाकीला या बद्दल काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान पार्किंग शुल्क आकारण्याचा आदेश देण्यात आला असला तरी त्यासाठी एजन्सीला कंत्राट देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात सांगण्यात आले आहे. एका तासाला २० रुपये असे पार्किंग शुल्क पणजी  शहरात तरी कुठेही नाही. पाटो पणजी येथे इडीसीकडून चार चाकीसाठी आकारले जाणारे शुल्कही चार तासांसाठी १० रुपये इतके कमी आहे. त्यामुळे रुग्णांकडून किंवा  रुग्णांच्या नातेवाईकांकडून २० रुपये एका तासाला शुल्क आकारणे ही पचनी पडणारी गोष्ट निश्चित होणार नाही. खाजगी उपचार न परवडणारे लोकच गोमेकॉत आणि इतर सरकारी इस्पितळात उपचारासाठी येत असतात. म्हणजेच सरकारी इस्पितळात उपचार करून घेणारे लोक  काही पैसेवाले असतात अशातलाही भाग नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना वाहन पार्क करून कधी कधी अनेक दिवस तिथेच रहावे लागते. शिवाय एखाद्या दाखल करण्यात आलेल्या रुग्णासाठीच नातेवाईकाला दिवसाला चारवेळा बाहेर जाऊन यावे लागते. अशा प्रसंगी प्रत्येकवेळी पैसे द्यावे काय हा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यामुळे हा निर्णय बूमरेंग होण्याची शक्यताही आहे. दरम्यान गोमेकॉच्या शवागरात ठेवण्यात येणा-या मृतदेहासाठी द्यावे लागणा-या रकमेतही शंभर टक्के वाढ करण्यास सांगण्यात आले आहे. सद्य स्थितीत शवागारात एक दिवस मृतदेह ठेवण्यासाठी नातेवाईकाला १०० रुपये द्यावे लागतात. नवीन आदेशानुसार ते २०० रुपये करण्यात येणार आहे.

टॅग्स :goaगोवा