शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारमध्ये भूकंपसदृश्य स्थिती, मंत्री खंवटेंकडूनही हल्लाबोल, सचिवालयात जाणे थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 19:02 IST

सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष आणि अपक्ष मंत्री ठप्प प्रशासनावर प्रचंड संतापलेले असून पर्रीकर सरकारमध्ये शनिवारी तर भूकंपसदृश्य स्थिती तयार झाली आहे.

पणजी : सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष आणि अपक्ष मंत्री ठप्प प्रशासनावर प्रचंड संतापलेले असून पर्रीकर सरकारमध्ये शनिवारी तर भूकंपसदृश्य स्थिती तयार झाली आहे. एका बाजूने म. गो. पक्ष व दुस-या बाजूने अपक्ष मंत्री रोहन खंवटे या दोघांनी स्वतंत्रपणे  प्रशासनाचे वाभाडे काढले. कामेच होत नाहीत, अर्थ खाते सहकार्यच करत नाही असे सांगत मंत्री खंवटे यांनी आपण सचिवालयात जाणेच बंद केल्याचे सांगितले. दुस-या बाजूने प्रशासन चालण्यासाठी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा ताबा द्या, अन्यथा आम्ही निवडणुकीत उमेदवार उभा करू, असा थेट इशारा मगोपने ठरावाद्वारे दिला.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने ते गेले अनेक दिवस आपल्या घरीच आहेत. ते चतुर्थी सणापासून अजूनपर्यंत सचिवालयाची पायरीही चढू शकलेले नाहीत. ते घराबाहेर पडू शकत नाहीत व अशा वेळी नोकरशाही सुस्त बनल्याचा अनुभव मंत्र्यांना येत आहे. पर्वरीचे आमदार तथा आयटी खात्याचे मंत्री खंवटे हे कधीच प्रशासन ठप्प झाल्याचे बोलत नव्हते, पण आता अतीच झाल्याने आपल्यालाही बोलावे लागत आहे, असे खंवटे यांनी शनिवारी लोकमतला सांगितले. फाईल्स केवळ अर्थ खात्यातच टोलविल्या जात आहेत. कामे होत नाहीत. प्रशासन ठप्प झाल्याने निषेध म्हणून आपण सचिवालयात गेले आठ दिवस गेलो देखील नाही. यापुढेही जाणार नाही. मुख्यमंत्री गैरहजर असल्याचा गैरफायदा नोकरशाही घेत आहे व याची कल्पना पंधरा दिवसांपूर्वी आपण पर्रीकर यांनाही भेटून दिली होती, असे खंवटे म्हणाले.दरम्यान, मगो पक्षाच्या केंद्रीय समितीची शनिवारी पणजीत बैठक झाली. प्रशासनावर मोठा परिणाम झालेला असून कामे बंद पडत आहेत. अशा वेळी मंत्रिमंडळात ज्येष्ठ असलेले सुदिन ढवळीकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा द्या, अन्यथा आम्ही मांद्रे व शिरोडय़ातील निवडणुकीसह लोकसभा निवडणुकीवेळीही उमेदवार उभे करू, असे जाहीर करणारा ठराव मगोपने बैठकीत घेतला. ही माहिती अध्यक्ष दीपक ढवळीकर व इतरांनी दिली. एकदा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुन्हा मगोपची बैठक होईल, असे ते म्हणाले. तसेच खनिज खाणी सुरू करण्यासाठी दिल्लीत जंतरमंतरवर खाण अवलंबित जे आंदोलन करतील, त्या आंदोलनात मगोप सहभागी होईल, असाही ठराव पक्षाने घेतला. मगोप हा पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचा प्रमुख घटक आहे.अर्थ खात्याकडे पाठविलेल्या फाईलचा फुटबॉल होतो. गोव्याला आयटीचे केंद्र बनविण्याच्या गोष्टी सरकार सांगते व त्यासाठी प्रभावी आयटी धोरणही आणते. मात्र अर्थसंकल्पात आयटीसाठी ज्या तरतुदी केल्या गेल्या आहेत, त्या तरतुदींनुसार देखील निधी उपलब्ध होत नाही. मग धोरण कागदावरच राहील. लोक आमच्याकडे कामाचे रिपोर्टकार्ड मागतील, अधिका-यांकडे मागणार नाही. आम्ही दिवसाचे सोळा तास अखंडितपणे काम करतो पण निधी उलब्ध होत नसल्याने कामे थंडावली. अतीच झाल्यामुळे आता मी तोंड उघडले.- मंत्री रोहन खंवटे