शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय क्रीडा दिनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतली फिट राहण्याची प्रतिज्ञा

By समीर नाईक | Updated: August 29, 2023 15:53 IST

देशभर मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला

समीर नाईक, पणजी: राज्यात मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून सर्व सरकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी फिट इंडिया उपक्रमा अंतर्गत स्वत:ह फिट राहण्याची आणि देशाला फिट ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली. खाते प्रमुखांनीच आपापल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची प्रतिज्ञा दिली. देशभर मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यातील सर्व सरकारी खात्यांच्या कर्मचाऱ्यांनी क्रीडा पोशाखात कार्यालयात हजर राहावे आणि फिट इंडिया उपक्रमांतर्गत त्यांनी प्रतीज्ञा घ्यावी, असा आदेश क्रीडा खात्यातर्फे सर्व सरकारी खातेप्रमुखांना काढला होता. या पार्श्वभूमीवर ही प्रतिज्ञा घेण्यात आली.

जरी क्रीडा पोशाखात कार्यालयात हजर राहावे असा आदेश देण्यात असला, तरी बहुतांश कर्मचारी आपल्या नेहमीच्या पोशाखातच कार्यालयात हजर होते. एक दिवस आधीच आदेश जारी करण्यात आल्याने एैनवेळी अनेकांना क्रीडा पोशाखाची व्यावस्था करणे जमले नाही, असे कळाले आहे.

क्रीडा सचिव स्वेतिका सच्चान यांनी हा आदेश जारी केला होता. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केली जाते. याचे औचित्य साधून केंद्रीय क्रीडा व युवा व्यावहार खात्यातर्फे सर्व राज्यांना सरकारी खात्यात क्रीडा दिन साजरा करण्याची सूचना करण्यात आली होती. या आदेशाची अंमलबजावणी राज्यातही गाेवा क्रीडा आणि युवा व्यावहार खात्यातर्फे करण्यात आली.

अशी होती प्रतिज्ञा...

मी शपथ घेतो, की सक्रिय आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी मी सदैव अग्रेसर असणार. माझ्या फिटनेस आणि आरोग्यासाठी दररोज ३० मिनिटे वेळ काढेन. माझ्या कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना आणि शेजाऱ्यांना तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहित करेन. व फिटनेस चाचणीचे फिट इंडिया मोबाइल ॲपवर नियमितपणे मूल्यांकन करणार, अशी प्रतिज्ञा कर्मचाऱ्यांनी घेतली.

टॅग्स :goaगोवा