शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याहून माशांच्या निर्यातीवर सरकारचा बंदीचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 10:52 IST

गोव्याहून थायलंड, फिलिपाईन्स, व्हिएतनाम आदी ठिकाणी माशांची जी निर्यात केली जाते, त्यावर बंदी लागू करण्याचा विचार आता प्रथमच गोवा सरकारने चालवला आहे.

पणजी : गोव्याहून थायलंड, फिलिपाईन्स, व्हिएतनाम आदी ठिकाणी माशांची जी निर्यात केली जाते, त्यावर बंदी लागू करण्याचा विचार आता प्रथमच गोवा सरकारने चालवला आहे. मासे गोमंतकीयांच्या जेवणातील अत्यंत महत्त्वाचा घटक. माशांवीना गोमंतकीय व्यक्ती जगू शकत नाही. मात्र अलिकडील काळात गोमंतकीयांना खूपच महागात माशांची खरेदी करावी लागत आहे. प्रचंड प्रमाणात गोव्याहून माशांची निर्यात होते. शिवाय गोव्यातील मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये बहुतांश ताजी मासळी पाठवली जाते. परिणामी सामान्य गोमंतकीय ग्राहकासाठी बाजारात मासळीचा तुटवडा असतो. जे थोडे मासे उपलब्ध असतात ते अत्यंत महाग स्वरूपात खरेदी करून घरी न्यावे लागतात. सरकार आता यावर उपाय काढू पाहत आहे.

मच्छिमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी सांगितले की, माशांच्या निर्यातीवर बंदी लागू करण्याचा निर्णय यापुढे घ्यावा लागेल. गोमंतकीयांना स्वस्त दरात मासे उपलब्ध व्हायला हवे. गोव्याचे सगळे समुद्र धन परराज्यात आणि विदेशात पाठविले जात असल्याने गोमंतकीयाना स्वस्त दरात मासे मिळत नाहीत.

गोव्याहून साधारणत: एकूण उत्पादनापैकी 30 टक्के मासे विदेशात निर्यात केले जातात. मंत्री पालयेकर म्हणाले की, गोवा सरकार गोव्यातील ट्रालर्सना (यांत्रिक मच्छीमार बोटी) दरवर्षी काही कोटींचे अनुदान देते. गेल्या पाच वर्षांत एकूण 83 कोटींचे अनुदान देण्यात आले आहे पण सरकारी अनुदान घेऊन देखील मासे पकडल्यानंतर ते गोव्याबाहेर पाठविले जातात. हे चुकीचे आहे.दरम्यान, सरकार आता मच्छिमार विकास महामंडळ स्थापन करणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. यापुढे ट्रालर्सना दिले जाणारे अनुदान बंद करून हे अनुदान महामंडळाकडे वळविण्याचाही सरकारचा विचार आहे. महामंडळातर्फेच मासेमारी सुरू करावी असाही विचार पुढे आणण्यात आला आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर