शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

असंघटितपणामुळे सरकार पडू शकते - विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 18:43 IST

असंघटितपणावर उपाय काढला नाही तर सरकार पडू शकते, असा इशारा भाजपाप्रणीत आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व मंत्री विजय सरदेसाई यांनी बुधवारी येथे दिला.

पणजी : विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात शिरोडय़ातून भाजपाविरोधात मगो पक्ष रिंगणात उतरतोय. यावरून सत्ताधारी आघाडीत असंघटितपणा असल्याचा संदेश बाहेर जातो. असंघटितपणावर उपाय काढला नाही तर सरकार पडू शकते, असा इशारा भाजपाप्रणीत आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व मंत्री विजय सरदेसाई यांनी बुधवारी येथे दिला.पत्रकारांशी बोलताना मंत्री सरदेसाई म्हणाले, की आमच्याकडे सरकार वाचविण्यासाठी सगळा बी प्लॅन तयार आहे पण सत्ताधारी आघाडीतील एक पक्ष दुस-या पक्षाविरोधात पोटनिवडणूक लढवतोय हे मला पटत नाही. मैत्रीपूर्ण लढत असे कुठेच कधी असत नाही. मी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमोरही हा विषय मांडला व त्यांना देखील हा काय प्रकार आहे, हे विचारले. मात्र, मुख्यमंत्र्यांकडेही त्याचे उत्तर नाही, असे मला दिसून आले. त्यांनाही हे कोडे समजलेले नाही. परंतू मनोहर पर्रीकर आजारातून थोडे बरे होऊन आल्यानंतर त्यांना या विषयाकडे लक्ष द्यावे लागेल.मंत्री सरदेसाई म्हणाले, की सत्ताधारी आघाडीत जर असंघटीतपणा  राहिला तर सरकार अस्थिर आहे असे लोक समजतील. असंघटितपणामुळे सरकार पडूही शकते. आम्हाला बी प्लॅन तयार करावाच लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्थिती स्पष्ट करायला हवी. सरकारमध्ये राहून एक घटक पक्ष दुस-या पक्षाविरुद्ध लढू शकतच नाही.सरकार स्थिर : दिपकमगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, सत्ताधारी आघाडीकडे एकूण 23 आमदार आहेत. त्यामुळे सरकार स्थिर आहे. मगो पक्ष काही सरकारमधून बाहेर जात नाही. त्यामुळे सरकार पडणार नाही. सरकार पडण्यासाठी मगोप किंवा फॉरवर्ड यापैकी एका पक्षाला सत्तेबाहेर जावे लागेल. आम्ही तरी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आहोत व बाहेर जाण्याचा विचार नाही.

टॅग्स :goaगोवा