लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: उन्हाळी सुट्टया आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मडगाव जंक्शन दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११२९ मुंबई सीएसएमटी-मडगाव स्पेशल १० एप्रिल (शुक्रवार) आणि १४ एप्रिल (मंगळवार) रोजी मुंबईहून मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी, गाडी क्रमांक ०११३० मडगाव मुंबई सीएसएमटी स्पेशल १० एप्रिल आणि १४ एप्रिल रोजी मडगावहून सायंकाळी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबईत पोहोचेल.
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी या विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तरी प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.
संरचना: १८ वातानुकूलित ३- टायर इकॉनॉमी डबे व २ जनरेटर व्हॅन
आरक्षण: आरक्षण सर्व PRS केंद्रांवर तसेच IRCTC (www.irctc.co.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ट्रेनच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
Web Summary : To ease summer rush, railways will run AC special trains between Mumbai CSMT and Madgaon. Trains will operate on select dates in April, offering Konkan Railway travelers much-needed relief. Bookings are now open, railway urges passengers to avail the facility.
Web Summary : गर्मी की भीड़ को कम करने के लिए, रेलवे मुंबई सीएसएमटी और मडगांव के बीच एसी स्पेशल ट्रेनें चलाएगा। ट्रेनें अप्रैल में चुनिंदा तारीखों पर चलेंगी, जिससे कोंकण रेलवे यात्रियों को काफी राहत मिलेगी। बुकिंग शुरू हो गई है, रेलवे ने यात्रियों से सुविधा का लाभ उठाने का आग्रह किया है।