शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गोमंतकीय मुलांचे गणित काही सुटेना; गणितात उत्तीर्ण टक्केवारी कमीच

By वासुदेव.पागी | Updated: May 7, 2023 18:34 IST

गोव्यातील मुलांना गणीत विषय हा अजूनही कठीण जात असल्याचे यंदाच्या बारावीच्या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

पणजी (गोवा) : गोव्यातील मुलांना गणित विषय हा अजूनही कठीण जात असल्याचे यंदाच्या बारावीच्या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कारण या विषयात सर्वात कमी उत्तीर्ण टक्केवारी ९६.१३ इतकी लागली आहे. गोव्यातील विद्यार्थ्यांची गणितात कामगिरी सुमार दर्जाची असल्याचे यापूर्वीही राष्टीय स्तरावरील सर्वेक्षणात म्हटले होते. 

बारावीला विज्ञान आणि कला विभागात मिळून गणिताचा पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या होती १०१८४. त्यातील ९७९० विद्यार्थी गणिताला उत्तीर्ण झाले आणि ३९४ विद्यार्थी नापास झाले. ३.८७ टक्के अनुत्तीर्ण प्रमाण आहे. मागील वर्षी हे प्रमाण ३.६२ टक्के इतके होते. 

तसेच या विषयात १०० टक्के गुण मिळविणारेही आहेत, परंतु सरासरी उत्तीर्ण टक्केवारीत सुधारणा होताना दिसत नाही. एक वर्षापूर्वी राष्ट्रीय पातळीवरील एका सर्वेक्षण अहवालातही गोव्याचे विद्यार्थी गणितात मागे असल्याचा निश्कर्ष काढण्यात आला होता. त्यामुळे गोव्याची ही प्रतिमा पुसली जाण्यासाठी अजूनही उपाय योजना करण्याची गरज भासते आहे. इतर विषयात कामगिरी समाधानकारक होताना दिसत आहे. 

गणिताचाच सख्खा भाऊ असलेल्या सांख्युक (स्टॅटिस्टीक्स) या विषयात मात्र मुले चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. या विषयात ९९.८२ टक्के उत्तीर्ण टक्केवारी आहे. अनुत्तीर्ण टक्केवारी ही ०.८ टक्के इतकी कमी आहे. इतिहास ९७.४० टक्के, राजशास्त्र ९८.३४ टक्के, समाजशास्त्र ९८.१८ टक्के इतकी आहे. भाषा विषयातही कामगिरी समाधानकारक आहे. कोकणी, मराठी आणि हिंदी विषयात अनुक्रमे ९८.०६ टक्के, ९८.४५ टक्के आणि ९८.०९ टक्के इतके उत्तीर्ण प्रमाण आहे. इंग्रजीत ९७.९८ टक्के इतके उत्तीर्ण प्रमाण आहे.  जे विषय कमी विद्यार्थी घेतात अशा संस्कृत विषयाला ९८.९० टक्के तर ऊर्दू भाषेला १०० टक्के उत्तीर्ण प्रमाण आहे. तसेच पोर्तुगीज आणि फ्रेंच भाषेलाही उत्तीर्ण टक्केवारी ही ९८.५८ टक्के आणि १०० टक्के अशी आहे. 

 

 

टॅग्स :goaगोवाexamपरीक्षा