शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोमेकॉत 'ओ' पॉझिटिव्ह 'ए' पॉझिटीव्ह रक्ताचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 22:16 IST

ओ पॉझिटीव्ह आणि ए पॉझिटीव्ह गटाच्या रक्ताचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत तुटवढा निर्माण झाला आहे. सर्वाधिक मागणी असणा-या या रक्तगटाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणिबाणीच्या प्रसंगी रुग्णाला या रक्ताची गरज भासली तर काय करावे असा प्रश्न समोर राहिला आहे. 

पणजी: ओ पॉझिटीव्ह आणि ए पॉझिटीव्ह गटाच्या रक्ताचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत तुटवढा निर्माण झाला आहे. सर्वाधिक मागणी असणा-या या रक्तगटाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणिबाणीच्या प्रसंगी रुग्णाला या रक्ताची गरज भासली तर काय करावे असा प्रश्न समोर राहिला आहे. ओ पॉझिटीव्ह आणि ए पॉझिटीव्ह रक्तगटाचे लोक  खूप असतात. त्यामुळे सहाजिकच या गटासाठी दातेही खूप असतात. त्यामुळे या गटाच्या रक्ताची गोमेकॉच्या रक्तपेढीत सहसा कधी चणचण भासत नाही. मागील चार दिवसांपासून मात्र या रक्तगटाच्या रुग्णांना रक्तपेढीतून रक्त मिळणार नाही. कारण या रक्काचा गोमेकॉतील रक्तपेढीचा साठा संपलेला आहे. गोमेकॉच्या रक्तपेढीतूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसात अपघातांचे प्रमाण वाढले होते. अनेक अपघातग्रस्ताना कॅज्युअल्टीत दाखल करण्यात आले होते. अशा आणिबाणीच्या प्रसंगी रक्तपेढीतील रक्त वापरावे लागते. ओ पॉझिटीव्ह हा रक्तगट काही अपवाद वगळल्यास सर्वच रक्तगटाच्या लोकांसाठी वापरता येत असल्यामुळे ह्या ह्या रक्तगटाचे रक्ताचा अधिक वापर केला जातो. तसेच या दिवसात अपघातात सापडलेल्या ज्या रग्णांना  ए पॉझिटिव्ह रक्तगटाचे होते. त्यामुळे या रक्तगटातील रक्तपेढीतील रक्त संपले असावे अशी माहिती कॅज्यअल्टीतील एका अधिका-याकडून देण्यात आली. या विषयी गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिवानंद बांदेकर यांना विचारले असता त्यांनी अधिक रुग्णांना रक्त देण्यात आल्यानेच तुटवढा झाला असावा असे सांगितले. परंतु ही तात्पुरती स्थिती असून गोमेकॉची रक्तपेढी आतापर्यंत दात्यांनीच समृद्ध केली आहे आणि निर्माण झालीली तात्पुरती तूटही तेच भरून काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे ही फार मोठी चिंतेची बाब नसल्याचेही ते म्हणाले. 

दात्यांना आवाहनगोमेकॉच्या रक्तपेढीत निर्माण झालेला तुटवढा भरून काढण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन गोमेकॉकडून दात्यांना करण्यात आले आहे. विशेषत: ओ पॉझिटीव्ह आणि ए पॉझिटीव्ह रक्तगटाच्या व्यक्तीना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोमेकॉत सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या दरम्यान दाते येवून रक्तदान करू शकतात. अधिक माहितीसाठी २४५८७२४ व २४९५०३२ या क्रमांकावर रक्तपेढी विभागाशी दाते संपर्कही करू शकतात.

टॅग्स :goaगोवा