शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

असंवेदनशील वर्तनाबाबत गोमेकॉची परिचारिका निलंबित, मेट्रनला कारणे दाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 19:06 IST

पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळातील (गोमेकॉ) परिचारिकांनी रुग्णांबाबत व रुग्णांच्या नातेवाईकांबाबत संवेदनशील पद्धतीने वागावे, असा प्रयत्न सरकारने चालविला आहे.

पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळातील (गोमेकॉ) परिचारिकांनी रुग्णांबाबत व रुग्णांच्या नातेवाईकांबाबत संवेदनशील पद्धतीने वागावे, असा प्रयत्न सरकारने चालविला आहे. त्याविषयी परिचारिकांना यापूर्वी सरकारने कारवाईचे इशारेही दिले. तथापि, काही परिचारिकांबाबत अजूनही आरोग्य खात्याकडे तक्रारी येत आहेत. सोमवारी एका तक्रारीची दखल घेऊन गोमेकॉ इस्पितळाचे डीन प्रदीप नाईक यांनी 143 वॉर्डमधील परिचारिका योगिता नाईक हिला निलंबित केले तर मेट्रनला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले, की गोमेकॉला चादरी व अन्य साहित्याचा खूप पुरवठा करण्यात आला आहे. तथापि, रुग्णांसाठी असलेल्या खाटांवरील चादरी, बेडशिट्स वगैरे नियमितपणे बदलले जात नाही. आळस केला जातो. आपणही काही वेळा गोमेकॉला भेट देऊन स्थिती पाहिली आहे. चादरी, बेडशिट्स वगैरे बदला असे वरिष्ठांनी वारंवार वॉर्डमधील संबंधित कर्मचा-यांना सांगण्याची गरज नसते. त्यांना ते कळायला हवे.मंत्री राणे म्हणाले, की काही परिचारिका रुग्णांच्या नातेवाईकांशी नीट वागत नाहीत. आपल्याकडे तक्रारी येत आहेत. तक्रार केली म्हणूनही पुन्हा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रागावले जाते. याचमुळे सोमवारी एका परिचारिकेला निलंबित केले गेले. सुधारणा झाली नाही तर आणखी काही जणांचे निलंबन केले जाईल. योगिता नाईक असे स्टाफ नर्सचे नाव आहे.दरम्यान, गोमेकॉसह गोव्यातील सर्व सरकारी इस्पितळांमध्ये परप्रांतीय रुग्णांकडून साधारणत: 25 ते 30 टक्के असे शुल्क आकारले जाणार आहे. आरोग्यमंत्री राणे यांनी सोमवारी अतिरिक्त आरोग्य सचिव सुनील मसुरकर व इतरांची बैठक घेतली व कोणत्या उपचारासाठी किती शुल्क आकारावे याविषयीचा एक मसुदा तयार केला आहे. 1 डिसेंबरपासून अंमलबजावणी केली जाईल. अजून पूर्ण मसुदा तयार झालेला नाही. पण शुल्क आकारण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. संबंधित समितीने अहवालही तयार केला आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले. संबंधित समितीच्या चार बैठका झाल्या व त्यावेळी दीनदयाळ स्वास्थ्य विमा योजनेंतर्गत निश्चित झालेल्या दरांच्या तुलनेत 30 टक्के दर लागू करावा, असे तत्त्वत: ठरले आहे. अंतिम निर्णय लवकरच सरकार घेणार आहे. परप्रांतांमधून गोमेकॉत साधारणत: 30 टक्के रुग्ण येत असतात.