शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : परदेशींच्या धंद्यांची FDAकडून तपासणी,अंमलीपदार्थांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांची घेणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 13:01 IST

गोव्यातील किनारपट्टी भागांमध्ये ज्या विदेशी व्यक्ती विविध प्रकारचे क्लब्स, शॅक्स, हॉटेल्स चालविण्याचे धंदे करत आहेत, त्यांची यादी सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने (एफडीए) तयार केली आहे.

पणजी : गोव्यातील किनारपट्टी भागांमध्ये ज्या विदेशी व्यक्ती विविध प्रकारचे क्लब्स, शॅक्स, हॉटेल्स चालविण्याचे धंदे करत आहेत, त्यांची यादी सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने (एफडीए) तयार केली आहे. लवकरच एफडीएकडून पोलिसांच्या मदतीने अशा ठिकाणी तपासणी करून कारवाई केली जाईल. विदेशींकडून चालविले जाणारे अनेक शॅक्स, क्लब, हॉटेल्स तपासली जातील, असे आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी येथे जाहीर केले.

मंत्री राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. एफडीएने पोलीस प्रमुखांना पत्र लिहिले आहे व एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन-तीन पोलीस शिपाई असलेले पथक पुरविण्याची विनंती केली आहे. पोलीस प्रमुख त्यासाठी तयार झाले आहेत. यापुढे एफडीएकडून विदेशी व्यक्तींचे धंदे तपासले जातील. एफडीएला गृहित धरता येणार नाही. अन्न सुरक्षेच्यादृष्टीने एफडीए कारवाई करील. क्लब, शॅक्स, हॉटेल यांची स्वयंपाकगृहे तपासली जातील. तीन तारांकित ते पाच तारांकित अशा सगळ्य़ा हॉटेल्समध्ये एफडीएची पथके कधीही भेट देऊ शकतात. एफडीएचा परवाना घेतलेला नाही असे आढळल्यास स्वयंपाकगृह सिल केले जाईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. विदेशींकडून गोव्यात केले जाणारे काही व्यवसाय म्हणजे अंमली पदार्थ विक्री व्यवसायाची केंद्रे आहेत, असेही राणे म्हणाले. आरोग्य खात्यात लवकरच काही दुरुस्त्या करून अन्न व औषध प्रशासन यंत्रणेला ज्यादा अधिकार दिले जाणार आहेत हेही त्यांनी नमूद केले.

छोट्या विक्रेत्यांना दिलासा

दरम्यान, गोव्यात सद्या मासळीची आयात बंद आहे. गोव्यापासून 60 किलोमीटर अंतराच्या परिघात जे छोटे मासळी व्यवसायिक स्वत:चा व्यवसाय करतात त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार काही पाऊले निश्चितच उचलणार आहे. त्यासाठी आवश्यक ते उपाय योजण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. छोट्या व्यवसायिकांना मदत करावी असे आम्ही ठरवले आहे. फक्त छोट्या व्यवसायिकांच्या नावाखाली मोठे मासळी व्यापारी घुसू नयेत म्हणून काळजी घेतली जात आहे. कारण एकदा मोठे व्यापारी जर घुसले तर पुन्हा फॉर्मेलिन माशांचा वाद निर्माण होऊ शकतो, असे राणे म्हणाले.

टॅग्स :Drugsअमली पदार्थgoaगोवा