शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

गोव्याचा पाणीपुरवठा खंडित

By admin | Updated: December 28, 2015 01:36 IST

पावसाने यंदा दडी मारल्याने धरणात २ मीटर पाण्याचा तुटवडा झालेला असताना आतापासूनच पाणी जपून वापरा, अशा

विशांत वझे ल्ल डिचोली पावसाने यंदा दडी मारल्याने धरणात २ मीटर पाण्याचा तुटवडा झालेला असताना आतापासूनच पाणी जपून वापरा, अशा सूचना करण्याची वेळ गोव्यावर आली आहे. कारण तिळारीच्या भरंवशावर अवलंबून असलेल्या गोव्याला पुन्हा हादरा बसला आहे. तिळारी धरणापासून ९ किलोमीटर अंतरावर गोव्याकडे येणाऱ्या तिळारी कालव्याला मोठे भगदाड पडल्याने गोव्याला येणारे पाणी बंद करण्यात आल्याने गोव्याला पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वी साटेली-खानयाळे परिसरातील कालवा मोठ्या प्रमाणात खचला असून पाणी वाया जात आहे. येथे मोठे भगदाड पडल्याने दुरुस्तीकाम हाती घेतानाही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच गोव्याकडे येणारे पाणी बंद करून कालव्याची डागडुजी युद्धपातळीवर चालू करण्यात आली आहे. कालवा फुटताच तेथे तात्पुरता दगड-विटांचा थर रचून सिमेंटच्या पिशव्या बांधून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तयारी चालवली असली तरी एकूणच या बाबतीत महाराष्ट्र सरकाराने बेफिकिरी दाखवली असून वर्षातून किमान दोन ते तीन वेळा असे प्रकार घडतच आहेत. त्यामुळे गोव्याला पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तिळारी धरणाचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली कालवा दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी काही दिवस लागण्याची शक्यता असली तरी सोमवारी सायंकाळपर्यंत गोव्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचा दावा धरण अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. २०१४ साली खानयाळे साटेली येथे कालव्याला प्रचंड मोठे भगदाड पडल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत गोव्याचे पाणी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तातडीने जलसंसाधन खात्यामार्फत साळ नदीचे पाणी पंपिंग करण्याची योजना आखून शेती वाचवण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा पाणी बंद झाल्याने हा तिळारीच्या पाण्याचा द्रविडी प्राणायाम गोव्यासाठी तापदायक ठरला आहे. गोव्याने लाखो रुपये खर्च करून धरणग्रस्तांसाठी आर्थिक मदतीसाठी सहकार्य केलेले आहे. विस्थापितांना मदत केली आहे. मात्र, गोव्याला पाण्याची हमी मिळताना दिसत नाही. याबाबत राज्यातील शेतकरी बरेच नाराज आहेत. डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी, तिळारीचे पाणी हे ‘राम भरोसे’ असल्याने गोव्याने स्वयंपूर्ण होण्यासाठी योजना आखण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.