शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

गोव्याचे पर्यटन मंत्री ड्रग्जविरुद्ध आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 13:47 IST

विविध प्रकारच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले गोव्याचे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर हे आता राज्यातील अंमली पदार्थ तथा ड्रग्ज व्यवहारांविरुद्ध आता आक्रमक झाले आहेत.

पणजी : विविध प्रकारच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले गोव्याचे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर हे आता राज्यातील अंमली पदार्थ तथा ड्रग्ज व्यवहारांविरुद्ध आता आक्रमक झाले आहेत. ड्रग्ज व्यवहारांविरुद्ध पोलिसांनी अधिक व्यापक कारवाई करण्याची गरज आहे, असे मत मंत्री आजगावकर यांनी व्यक्त केले.लोकांनी पुढे यायला हवे व ड्रग्ज व्यवहार कुठे कुणाकडून चालविले जातात, याची माहिती पोलिसांना द्यायला हवी. राज्यातील वाढत्या अंमली पदार्थ व्यवहारांविरुद्ध सर्व आमदारांनी व मंत्र्यांनीही संघटीत व्हावे, असे आवाहन मंत्री आजगावकर यांनी केले. आम्हाला युवा पिढी बरबाद झालेली पाहायचे नाही. पोलिसांकडून मटका जुगाराविरुद्ध कारवाई केली जाते हे चांगले आहे. पण मटक्यापेक्षाही ड्रग्ज व्यवहारांचा विषय हा अधिक मोठा व अधिक गंभीर आहे, असे मंत्री आजगावकर म्हणाले.मंत्री आजगावकर यांनी गेल्या वर्षीही ड्रग्ज व्यवहारांविरुद्ध जोरदार भूमिका घेतली होती. ज्या भागातील ड्रग्ज व्यवहाराच्या अड्ड्यावर पणजीहून पोलिसांना जाऊन छापा टाकावा लागतो, त्या भागातील पोलीस निरीक्षकाविरुद्ध कारवाई व्हायला हवी, असा मुद्दा गेल्या वर्षी मंत्री आजगावकर यांनी मांडला होता व तो विषय त्यावेळी खूप गाजला होता. आता मंत्री आजगावकर यांनी नव्याने ड्रग्ज व्यवहारांवरून अप्रत्यक्षरीत्या गृह खात्यावर दबाव आणणे सुरू केले असल्याचे राजकीय क्षेत्रात मानले जाते. पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) सध्या ड्रग्ज व्यवहार व राजकारण्यांचे संबंध या प्रकरणी सभागृह समितीने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने चौकशी काम करत आहे. एका माजी गृहमंत्र्याच्या पुत्राला नुकतेच एसआयटीने समन्सही पाठवले होते.बलात्काराच्या घटनांविरुद्धही मंत्री आजगावकर यांनी संताप व्यक्त केला. बलात्कार करणा-यांना दुबईमध्ये फाशी दिली जाते. तशीच पद्धत असायला हवी, असे मंत्री आजगावकर म्हणाले. बलात्कार करणा-यांना कुणाचीच माफी नसावी. बलात्कार करणा-यांना फाशी द्यावी हे माझे मत आहे. भारतात दुबईसारखी शिक्षा होत नाही. तशी शिक्षा झाली तरच बलात्कार करणा-यांमध्ये भीती निर्माण होईल, असे मंत्री आजगावकर म्हणाले. दरम्यान, राज्यातील वाढत्या ड्रग्ज व्यवहारांची माहिती पोलिसांना असते. पोलिसांनी अधिक माहितीसाठी भाजपाचे आमदार मायकल लोबो यांनाही बोलावून त्याबाबतची माहिती प्राप्त करावी, अशी मागणी विरोधी काँग्रेस पक्षाने केली आहे.

टॅग्स :goaगोवा