शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

गोव्यातील प्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 10:11 IST

कोरोना झाल्यानंतर योगीराज यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गेले दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.

फोंडा/पणजी : गोव्यातील पहिले युवा सतारवादक, रेडिओ कलाकार योगीराज नाईक बोरकर (५३) यांचे गुरुवार, दि. २९ एप्रिल रोजी निधन झाले. राजन मिश्रा यांच्या पाठोपाठ योगीराज यांच्या रूपाने संगीत क्षेत्राला बसलेला हा दुसरा धक्का आहे.

कोरोना झाल्यानंतर योगीराज यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गेले दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्राणज्योत मालवल्याचे कळताच सामाजिक, सांस्कृतिक व संगीत क्षेत्रातील शेकडो गोमंतकीयांना मोठा धक्का बसला. तीन वर्षांपूर्वी आकाशवाणीवरून त्यांची मुंबईत बदली झाली होती. शुक्रवारी त्यांचा मृतदेह पर्वरी येथे नेण्यात येईल. यानंतर त्यांच्या मूळ गावी म्हार्दोळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 

गोव्यातील सतारवादनाच्या क्षेत्रात योगीराज याने स्वतःचे एक नाव केले होते. त्यांची बहीण प्रचला आमोणकर हिला मी गायन शिकवले होते. पण योगीराजचे कार्यक्रम बघायचे तेव्हा एका वेगळ्याच विश्वात जायचे. त्यामुळे जेव्हा सतार आठवेल तेव्हा योगीराज हे नाव डोळ्यासमोर येत राहील.- डॉ. अलका देव मारुलकर

गोव्याचे अग्रगण्य सतारवादक आणि अंब्रुज महालाचे सुपुत्र योगीराज नाईक यांचे अकाली जाणे धक्कादायक आणि दुःखद आहे. त्याचे संगीत क्षेत्राला खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या जाण्याने गोमंतकाच्या संगीत क्षितिजावरील लखलखणास तारा निखळला. ईश्वर त्यांच्या आत्याला सद्गती देवो व परिजनांना शक्ती देवो.- नितीन ढवळीकर, शास्त्रीय गायक

योगीराज बोस्कर हे आकाशवाणीवरील कलाकार होते. त्यांच्या जाण्याने आकाशवाणीचे नुकसान तर झालेच, पण एक उच्च दर्जाचा सतारवादक आपण गमावला आहे. त्याच्या जाण्याने गोव्यातील संगीत क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे.- शकुंतला भरणे, आकाशवाणी कलाकार

टॅग्स :goaगोवा