शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

मुंबईतील गोवा भवन दोन वर्षापासून बंद ; पर्यायी व्यवस्थाही नाही, गोमंतकीयांची मुंबईत मोठी परवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 17:40 IST

मुंबईच्या जुहू येथील गोवा भवन डागडुजीच्या सबबीखाली गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ बंद असल्याने गोव्यातून मुंबईला कामाधंद्यानिमित्त किंवा वैद्यकीय उपचारांसाठी जाणा-या लोकांची मोठी गैरसोय झाली आहे.

पणजी : मुंबईच्या जुहू येथील गोवा भवन डागडुजीच्या सबबीखाली गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ बंद असल्याने गोव्यातून मुंबईला कामाधंद्यानिमित्त किंवा वैद्यकीय उपचारांसाठी जाणा-या लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. मुंबईतील वास्तव्यात गोमंतकीयांना येथे माफक दरात राहण्याची सोय उपलब्ध होती. आता महागड्या हॉटेलांमध्ये रहावे लागत आहे.

दोन वर्षे बंद ठेवूनही अद्याप या इमारतीचे दुरुस्तीकाम गोवा सरकार हाती घेऊ शकलेले नाही याचे कारण ‘म्हाडा’ बरोबर केलेल्या भाडेकराराची फाइल गहाळ झाल्याचे सांगण्यात येते. गोवा दमण दिव संघप्रदेश असताना हा भाडेकरार झाला होता त्यानंतर गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला आणि दमण, दिव वेगळा झाला. गोवा सरकारने ही फाइल दादरा, नगर हवेली प्रशासनाकडेही शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ती सापडू शकली नसल्याची माहिती मिळते.

गोव्याच्या गेल्या विधानसभा अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित झाला होता तेव्हा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाकडे बोलून काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजून पान हललेले नाही.जुहू येथे गुलमोहर रोड-१२ वर असलेली ही इमारत जुनी झाली असल्याच्या कारणास्तव तेथे स्थित गोवा भवन राज्य सरकारने डागडुजीसाठी म्हणून दोन वर्षांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता १८ आॅगस्ट २0१५ पासून अचानक बंद केले. गोव्याच्या सचिवालयात सर्वसाधारण प्रशासन विभागात या भवनातील खोल्या आरक्षित करुन गोवेकर मुंबईला जात असत. जुहूसारख्या शांत ठिकाणी आणि सांताक्रुझ येथील स्थानिक विमानतळापासून अंतर जवळ असल्याने गोवेकर मंडळी गोवा भवनातच रहात असत. डॉर्मिटरी, खोल्या अशी चांगली व्यवस्था याठिकाणी होती. हे भवन बंद झाल्याने आता मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी जाणाºया रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांचीही परवड झालेली आहे.

इमारतीच्या डागडुजीसाठी म्हाडाचा ना हरकत दाखला तसेच अन्य परवाने हातात नसतानाही नूतनीकरणासाठी ते बंद करुन लोकांची परवड करण्यात आली आहे. दोन वर्षे इंचभरही काम झालेले नसून लोकांना वेठीस धरण्याच्या गोवा सरकारच्या या प्रकाराबद्दल सर्व थरातून संताप व्यक्त केला जात आहे. इमारतीच्या डागडुजीसाठी परवानगी मिळण्याआधीच बुकिंग बंद का केले, असा संतप्त सवाल लोक करीत आहेत. सरकारने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कराराची मूळ प्रत गायब?ही इमारत महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाची (म्हाडा) आहे. अशी माहिती मिळते की, गोवा सरकारला ती भाडे तत्त्वावर देताना केलेल्या कराराची मूळ प्रत गायब झालेली आहे. गेले दोन महिने कराराची मूळ प्रत शोधण्यातच वेळ गेला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे संपर्क साधला असता ते म्हणाले की, गोवा संघप्रदेश असताना हा भाडेकरार झाला होता. ही प्रत दादरा, नगर हवेलीत असण्याची शक्यता असल्याने तेथेही शोधली जात आहे.या इमारतीत तुलिप, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आदी चार कार्यालये आहेत. वरचे दोन मजले अन्य आस्थापनांच्या ताब्यात आहेत व ती आस्थापने जागा रिकामी करण्यास तयार नाहीत, अशी माहिती देण्यात आली.आता खर्चही वाढणार-गोवा भवन इमारतीच्या डागडुजीवर १ कोटी ४४ लाख रुपये खर्च केला जाणार होता. हा अंदाजित खर्च दोन वर्षांपूर्वी काढलेला होता. परवाने हातात न पडल्याने अजून काम सुरुच व्हायचे आहे त्यामुळे हा खर्च आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. बांधकाम मजबूत करण्यासाठी स्ट्रक्चरल रिपेअर, वॉटरप्रूफिंग तसेच जमिनीच्या फरशा बदलणे रंगरंगोटी आदी कामासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे.