शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मटका प्रकरणात गोव्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 17:02 IST

मडगाव (गोवा): कथित मटका प्रकरणात चौकशी सुरू झाल्याने अडचणीत आलेले गोव्याचे विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांना दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने आज शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे दिलासा मिळाला. त्यांचे बंधू बाबल कवळेकर यांनाही न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना जर पोलिसांना चौकशीसाठी कवळेकरांची गरज असल्यास त्यांनी चौकशीसाठी ...

मडगाव (गोवा): कथित मटका प्रकरणात चौकशी सुरू झाल्याने अडचणीत आलेले गोव्याचे विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांना दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने आज शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे दिलासा मिळाला. त्यांचे बंधू बाबल कवळेकर यांनाही न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना जर पोलिसांना चौकशीसाठी कवळेकरांची गरज असल्यास त्यांनी चौकशीसाठी हजर रहावे अशी अट त्यांना घातली आहे.दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश भरत देशपांडे यांनी शुक्रवारी दुपारी दिलेल्या आदेशात बाबू कवळेकर यांना अटक केल्यास ५0 हजार रुपयांच्या तर बाबल कवळेकर यांना अटक केल्यास २0 हजार रुपयांच्या जामीनावर मुक्त करावे असे आपल्या आदेशात म्हटले. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात लोकांनी गर्दी केली होती.विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली एफआयआर नोंद झाली असून, यासंदर्भात त्यांच्या घरावर छापा टाकला असता मोठ्या प्रमाणावर मटक्याच्या चिठ्ठ्या सापडल्याचा दावा या प्रकरणात तपास करणा-या क्राईम ब्रँचने केला होता. यासंदर्भात दोन्ही कवळेकर बंधूंना चौकशीसाठीही बोलावले होते. मात्र अटकपूर्व जामिनाचा अर्ज सुनावणीस आला असता क्राईम ब्रँचने अत्यंत हलगर्जीपणाने हे प्रकरण हाताळल्याचे उघड झाले होते. सदर प्रकरणात कवळेकर यांचा हात असल्याचा कुठलाही पुरावा न्यायालयासमोर येऊ न शकल्यामुळे त्या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर झाला.