लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या १० व्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत भाग घेतला. विकसित भारतसाठी गोव्याचे मोठे योगदान असेल, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
ही बैठक २०४७ पर्यंत विकसित भारतसाठीच्या नियोजनाचा एक भाग असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. डॉ. सावंत म्हणाले की, बैठकीदरम्यान त्यांना पंतप्रधानांकडून अमूल्य मार्गदर्शन मिळाले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठीच्या रणनीतींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. विकसित भारतासाठी गोव्याचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे. राज्य टीम इंडियाचा एक महत्त्वाचा सदस्य म्हणून आपली भूमिका बजावण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विकसित गोवा २०४७ व्हिजन डॉक्युमेंट सादर केले. तसेच भौतिक, आर्थिक, सामाजिक आणि संस्थात्मक पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर चर्चा करण्यात आली.