शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विद्यापीठात येत्या वर्षापासून प्रवेश परीक्षा, पदवी परीक्षेतील गुणवत्ता यादी निष्प्रभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 17:23 IST

गोवा विद्यापीठात येत्या वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी पदवी परीक्षेचे गुण हा निकष धरला जाणार नाही. नवीन  शैक्षणिक वर्षापासून प्रवेशासाठी वेगळी परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत मिळविलेल्या गुणाच्या निकषांवर प्रवेश दिला जाणार आहे. 

- वासुदेव पागी

पणजी: गोवा विद्यापीठात येत्या वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी पदवी परीक्षेचे गुण हा निकष धरला जाणार नाही. नवीन  शैक्षणिक वर्षापासून प्रवेशासाठी वेगळी परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत मिळविलेल्या गुणाच्या निकषांवर प्रवेश दिला जाणार आहे. गोवा विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी येत्या वर्षापासून प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. पदवी परीक्षेतील गुणवत्ता यादीवर आतापर्यंत प्रवेश दिले जात होते, परंतु ही पद्धत येत्या वर्षापासून बदलण्यात आली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. १२ वी नंतर सीईटी, एनईईटी सारख्या परीक्षा जशा दिल्या जातात त्याच धर्तीवर परंतु वेगळ््या स्वरूपात या परीक्षा असतील. या परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर नवीन गुणवत्ता यादी बनविली जाणार आहे आणि त्या आधारावर प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती विद्यापीठाच्या एका अधिका-याकडून देण्यात आली. परीक्षेचे नेमके स्वरूप काय असेल याबाबत अद्याप निश्चित असे काही ठरलेले नाही, परंतु पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या अभ्यासक्रमातील विषयांवर ही परीक्षा घेण्याचा निर्णय तूर्त झाला आहे. एकूण गुण आणि इतर स्वरूप नंतर ठरविले जाणार आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. नवीन प्रवेश पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून होता, परंत यावेळी शैक्षणिक काउन्सीलने हा विषय गांभिर्याने घेतला. त्यासाठी चर्चा करण्यासाठी अनेक बैठकाही झाल्या. नवीन प्रक्रियेसंबंधी अधिकृतपणे  शिक्कामोर्तब झाले नसले तरी निर्णय पक्का झाला असल्याची माहिती विशेष सूत्रांकडून देण्यात आली. अशा प्रकारची प्रवेश प्रक्रिया देशातील अनेक अग्रगण्य विद्यापीठात या पूर्वीच लागू करण्यात आल्या आहेत. ही पद्धती प्रभावीही ठरत असल्याचे विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळाच्या काही पदाधिका-यांचे म्हणणे आहे. मंडळाच्या पुढील बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यतार्ह आहे. गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रवेश पद्धत ही सोयीस्कर होईल असाही विद्यापीठाचा दावा आहे.

टॅग्स :goaगोवा