शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विद्यापीठाच्या अभियंत्याला लाच घेताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 22:09 IST

गोवा विद्यापीठाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते अमित श्रीवास्तवला ५० हजार रुपयांची लाच घेताना भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. विद्यापीठाच्या स्वच्छता कंत्राटदाराला तो ५ टक्के दलाली देण्याची सक्ती करून छळत होता. 

पणजी: गोवा विद्यापीठाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते अमित श्रीवास्तवला ५० हजार रुपयांची लाच घेताना भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. विद्यापीठाच्या स्वच्छता कंत्राटदाराला तो ५ टक्के दलाली देण्याची सक्ती करून छळत होता. महिन्याकाठी ८० ते ९० हजार रुपये पगार असलेल्या या कार्यकारी अभियंत्याकडून गैरमार्गानेही पैसे कमाविणे चालूच होते. कोणताही किंतु, लाज, भीड भाड न ठेवता तो लाच मागत होता. गोवा विद्यापीठात स्वच्छतेचे कंत्राट मिळालेले पॅनोरमा एन्टरप्राईझचे मालक हेमा सुंदर रेड्डी यांच्याकडे ते लाचेची मागणी करीत होते. ते लाच देत नाहीत म्हणून असलेली नसलेली बारीक बारीक कारणे दाखवून ते कंत्राटदाराचा छळ करीत होते. त्यांनी  सादर केलेल्या बिलात त्रुटी दाखवित होते. ही बिले संमत करण्यात त्यांची भुमिका असल्यमुळे ती संमत करण्यासाठी लाच मागत होते. प्रत्येक बिलामागे बिलाच्या रकमेच्या ५ टक्के दलाली मागत होते. या तत्वावर  ५० लाख रुपयांच्या कंत्राटात त्यांना अडीच लाख रुपये दलाली होते. गोपी पेकेट नामक नागरिकाकडून या प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार नोंदविण्यात आली. त्यामुळे एसीबीने नियोजनबद्ध योजना आखून त्याला पकडण्याचा बेत केला. त्यासाठी या अभियंत्याला संशय येवू नये म्हणून त्याच्याकडे वाटाघाटी करून लाचेची रक्कम ५० हजारापर्यंत खाली आणून घेतली. ठरल्याप्रमाणे कारवाई करून त्याला पैसे घेताना पुराव्यासह पकडण्यात आले. पैसे देण्याची वेळही या अभियंत्यानेच ठरविली होती. सकाळी विद्यापीठात कार्यालयीन तास सुरू होण्यापूर्वी म्हणजे ९ वाजता त्याला ओशन पार्कच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पैसे घेऊन येण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे पैसे घेऊन गेले असता दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने आपली मोहीम फत्ते केली. मुख्य म्हणजे श्रीवास्तव लाच मागताना आणि लाचेची रक्कम घेतानाही टिपला गेला आहे. भ्रष्टाचार विरोधी कायद्याखाली त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नो्ंदविण्यात आला आहे. निरीक्षक फ्रांन्सीस कोर्त हे  या प्रकरणाचा तपास करीत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या विद्यापीठातील कार्यालयाचीही झडती घेण्यात आली आहे. तेथून काही ड्रॉवर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच त्याच्या घरीही छापा टाकण्यात आला होता.

टॅग्स :Arrestअटकgoaगोवा