शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Goa: गोव्यात दिवाळीच्या सप्ताहात बुडणाऱ्या १७ पर्यटकांसह कझाकिस्तानच्या दोन नागरिकांना वाचवले

By किशोर कुबल | Updated: November 14, 2023 23:20 IST

Goa News: दिवाळीच्या वीकेंडला गोव्याच्या किनारपट्टीवर  १७ पर्यटकांसह कझाकिस्तानच्या दोन नागरिकांना बोटांना वाचवण्यात आले.

- किशोर कुबल पणजी - दिवाळीच्या वीकेंडला गोव्याच्या किनारपट्टीवर  १७ पर्यटकांसह कझाकिस्तानच्या दोन नागरिकांना बुडताना वाचवण्यात आले. हरमल किनाऱ्यावर कझाकिस्तानचे दोन नागरिक, जे समुद्रात पोहताना प्रवाहात अडकले होते, त्यांना किनार्‍यावर पोहोचता आले नाही तेव्हा दृष्टी लाईफ सेविंग कंपनीचे जीवरक्षक प्रियांश ग्वास आणि सुहास गवस यांनी रेस्क्यू ट्यूब आणि सर्फबोर्डच्या मदतीने या दोघांची सुटका केली. याच समुद्रकिनाऱ्यावर पुण्यातील दोन तरुणांना  वाचवले. हरमल समुद्रकिनाऱ्यावरील वेगवेगळ्या घटनांमध्ये आणखी दोघांना वाचवण्यात आले. यात दिल्लीतील २६ वर्षीय तरुणाचा समावेश होता आणि दुसऱ्या घटनेत बेंगळुरू येथील २५ वर्षीय तरुणाचा समावेश होता.

कळंगुट किनाऱ्यावर २१ ते २४ वर्षे वयोगटातील उत्तर प्रदेशमधील तीन महिलांना  वाचवले. दृष्टी सागरी जीवरक्षक नकुल उसापकर, शुभम केळुसकर आणि कार्तिक नाईक यांनी तात्काळ त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली, त्यांना पोहण्यासाठी धडपडताना आणि पाण्यात वाहून जाण्याचा धोका होता. तिन्ही महिलांना किनाऱ्यावर आणून प्राथमिक उपचार करण्यात आले.

पंजाबमधील २९ वर्षीय पुरुषाला कळंगुट येथे वाचवले.  अहमदाबादमधील आणखी एका २५ वर्षीय तरुणालाही याच समुद्रकिनाऱ्यावर वाचवण्यात आले. मांद्रे येथे एका जोडपे किना-यावर पोहण्याचा प्रयत्न करताना बुडताना या जोडप्याला सुखरूपपणे किनाऱ्यावर परत आणले. आगोंदा येथे तसेच केळशी मुलगी आणि सिकेरी बीचवर तीन एकल बचाव करण्यात आले.

कळंगुट समुद्रकिनारी गर्दीत बेपत्ता झालेल्या पाच आणि नऊ वर्षांच्या दोन मुलींना दृष्टी सागरी जीवरक्षकांनी शोधून काढले आणि त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले.

टॅग्स :goaगोवाdrowningपाण्यात बुडणे