शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

Goa: गोव्यात अखेर पर्यटन खुले, कॅसिनो उद्यापासून ५0 टक्के क्षमतेने उघडणार, स्पा, मसाज पार्लर, नाइट क्लब्सबरील निर्बंधही शिथिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 00:16 IST

Goa News: गोवा सरकारने कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, नाइट क्लब्सवरील निर्बंध शिथिल केले आहेत. ५0 टक्के उपस्थितीने कॅसिनो तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित उपरोल्लिखित आस्थापने उद्या सोमवारपासून खुली होतील.

पणजी : गोवा सरकारने कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, नाइट क्लब्सवरील निर्बंध शिथिल केले आहेत. ५0 टक्के उपस्थितीने कॅसिनो तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित उपरोल्लिखित आस्थापने उद्या सोमवारपासून खुली होतील. जलसफरी करणाºया बोटी, वॉटर पार्क निम्म्या उपस्थितीने खुले करण्यास परवानगी दिली आहे. शिक्षण खात्याच्या स्वतंत्र एसओपीने विद्यालयेही कालांतराने खुली केली जाणार आहेत. (Tourism finally open in Goa, casinos to open at 50 per cent capacity from tomorrow, restrictions on spas, massage parlors, nightclubs eased)

महसूल खात्याचे सचिव संजय कुमार यांनी हा आदेश काढला. कॅसिनो तसेच स्पा, मसाज पार्लरांवर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कि ंवा प्रवेश करण्याच्या ७२ तास आधी कोविड निगेटिव्हचा आरटीपीसीआर दाखला घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल. दुसरा डोस किमान १५ दिवस आधी घेतलेला असावा. मास्क परिधान करणे, सॅनिटायझिंग, थर्मल स्क्रीनिंग तसेच कोविडची इतर मार्गदर्शक तत्त्वें पाळणे सक्तीचे आहे.आॅडिटोरियम, कम्युनिटी हॉल, सिनेमागृहांमध्ये ५0 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने बसविता येणार नाही.

मार्चमध्ये कोविडची दुसरी लाट आल्यापासून गेले सहा महिने कॅसिनो, मसाज पार्लर, स्पा, बंदच होते. दरम्यान, काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. केरळमधून येणाºया प्रवाशांना (विद्यार्थी तसेच कर्मचारी वगळता) आरटीपीसीआर निगेटिव्ह दाखला सक्तीचा असून ५ दिवस घरी विलगीकरणात राहणेही सक्तीचे आहे.

टीटीएजीकडून स्वागतपर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्त्व करणाºया टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी) संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की,‘ कॅसिनो, जलसफरी करणाºया बोटी, मसाज पार्लर आदी चालू करण्याची गरज होती. कॅसिनोंमध्ये येणाºया ग्राहकांमुळे शहरातील दुकानांना तसेच हॉटेलना व टॅक्सी व्यावसायिकांनाही लाभ होतो. पर्यटनावर निर्बंधांमुळे हॉटेलांमधील आॅक्युपन्सी कमीच होती. दोन आणि तीन तारांकित हॉटेलांमध्ये २0 टक्केही खोल्या भरलेल्या नसत. केवळ विकेंडला काय ते पर्यटक येत असत. आता सरकारने निर्बंध शिथिल केल्यास हॉटेल आॅक्युपन्सी ५0 टक्क्यांच्याही वर जाईल.शहा म्हणाले की,‘ सध्या दाबोळी विमानतळावर दिवसाकाठी ५५ ते ६0 विमानफेºया होतात. निर्बंध काढल्यानंतर आणखी १५ ते २0 विमानफेºया वाढतील. काही महिन्यांनी हे प्रमाण दिवशी ९0 ते १00 पर्यंत पोहचू शकते. महामारी येण्याआधी रोज ८0 विमाने गोव्यात यायची.दरम्यान, सरकारने वाढवलेले पर्यटन शुल्क तसेच अबकारी करवाढ मागे घ्यावी, अशी मागणी संघटनेने सरकार दरबारी केली आहे.  

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्या