शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोवा व्याघ्र क्षेत्र : खंडपीठाची नजर सर्वोच्च न्यायालयाकडे, अवमान याचिकेवर सुनावणी दिवाळी सुट्टीनंतर

By वासुदेव.पागी | Updated: November 6, 2023 16:15 IST

कारण १० नोव्हेंबर रोजी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहे.

पणजी: गोव्यातील व्याघ्र प्रकल्पाच्या प्रकरणात सोमवारी मुंबई उच्च्च न्न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर होणार  असलेली सुनावणी आता ११ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. कारण १० नोव्हेंबर रोजी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहे.गोव्यातील म्हादयी अभयारण्य परीसर आणि इतर निश्चित केलेला प्रदेश हा व्याघ्र संरक्षण क्षेत्र म्हणून वन्य प्राणी संरक्षक कायद्या अंतर्गत  अधिसूचित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तीन महिन्यापूर्वी दिला होता. त्यासाठी ३ महिन्यांची मूदत दिली होती. मात्र या मूदतीत राज्य सरकारने व्याघ्र संरक्षण क्षेत्र अधिसूचित केलेच नाही. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा दावा करून गोवा फाउंडेशन या बिगर सरकारी संस्थेने खंडपीठात सरकारच्या विरोधात अवमान याचिका सादर केली होती.या याचिकेवर ६ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. या याचिकेबरबरच सरकारकडूनही खंडपीठात एक अर्ज करून व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्यासाठी आणखी मूदत मागितली होती. या दोन्ही याचिका एकाच वेळी सोमवारी सुनावणीस येणार होत्या. दरम्यान यापूर्वी गोवा सरकारने व्याघ्र क्षेत्र अधिसुचीत करण्यासंबंधीच्या खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु अंतरिम स्थगिती मिळविण्यास सरकारला अपयश आले होते. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण १० नोव्हेंबर रोजी सनावणीस येणार आहे. ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी ही बाब खंडपीठाच्या नजरेस आणून दिल्यानंतर खंडपीठाने गोवा फाउंडेशनच्या आणि राज्य सरकारच्या याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ही सुनावणी तब्बल एक महिन्यानंतर म्हणजेच ११ डिसेंबर रोजी येणार आहे. कारण त्यापूर्वी दिवाळीची सुट्टी आहे.

टॅग्स :Tigerवाघgoaगोवा