शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : मांडवी नदीत बर्निंग फेरिबोटचा थरार; फेरीबोटचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 16:21 IST

मांडवी नदीत चोडण ते रायबंदर या मार्गावर दैनंदिन वाहतूक सेवा देणाऱ्या फेरीबोट सेवा प्रदान करणाऱ्या ‘बेती’ या फेरीबोटला प्रवासादरम्यान आग लागल्याचा प्रकार सोमवारी घडला.

पणजी : मांडवी नदीत चोडण ते रायबंदर या मार्गावर दैनंदिन वाहतूक सेवा देणाऱ्या फेरीबोट सेवा प्रदान करणाऱ्या ‘बेती’ या फेरीबोटला प्रवासादरम्यान आग लागल्याचा प्रकार सोमवारी घडला. अचानक धूर येऊ लागलेल्या या फेरीबोटचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. बोटीवरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. या प्रकाराने फेरीबोटींच्या सुरक्षिततेबाबत लोकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.सोमवारी सकाळी ही घटना घडल्याचे फेरीबोटीतील प्रवाशांनी सांगितले.

बोटीमधील कर्मचाऱ्यांनीच अग्निप्रतिबंधक साहित्याच्या मदतीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही. बेती फेरीबोटीच्या सायलेन्सरवर एक मोठी दोरी बांधलेली असते. सायलेन्सरची गरम हवा फेरी चालकाला लागू नये यासाठी ही जाड मोठी दोरी गुंडाळलेली असते. दोरी जुनी झाल्याने कमकुवत झाली होती. त्या दोरीने पेट घेतल्याचे समोर येत आहे. आग आटोक्यात आणल्यानंतर या फेरीबोटीतून सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. राज्यात पहिल्यांदाच अश्याप्रकारची घटना घडली आहे. या घटनेनंतर राज्यातील जुन्या होत चाललेल्या फेरीबोटींची देखरेख होत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.