शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Goa: साडेतेरा लाखांचे सुवर्णलंकार विकत घेतले, मात्र दिलेले धनादेश वटलेच नाही, संशयित मूळ दिल्लीचा

By सूरज.नाईकपवार | Updated: April 26, 2023 11:27 IST

Crime News: दिल्ली येथील एका भामटयाने गोव्यातील मडगाव शहरात  एका सोने विक्री आस्थापनाला तब्बल साडेतेरा लाखांचा गंडा घातल्याचे एक प्रकरण घडले असून, मडगाव पोलिसांनी या प्रकरणात संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.

- सूरज नाईक पवार मडगाव - दिल्ली येथील एका भामटयाने गोव्यातील मडगाव शहरात  एका सोने विक्री आस्थापनाला तब्बल साडेतेरा लाखांचा गंडा घातल्याचे एक प्रकरण घडले असून, मडगाव पोलिसांनी या प्रकरणात संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. शेजान ताज असे संशयिताचे नाव आहे. त्याने दागिने घेतले व दोन धनादेश दिले, मात्र हे धनादेश वटलेच नाही. पोलिसांनी भादंसंच्या ४२० कलमाखाली त्याच्यावर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विश्वजित ढवळीकर पुढील तपास करीत आहेत.

जगनाथ गंगाराम पेडणेकर ज्युवेलर्सचे व्यवस्थापक शैलेश चंद्रकांत माने हे तक्रारदार आहेत. फसवणुकीची वरील घटना मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात २ ते ५ तारखेच्या दरम्यान घडली होती. तक्रारदाराच्या मडगाव येथील आस्थापनात ही घटना घडली हाेती.

संशयिताने सोन्याचे एक नेकलेस, दोन बांगडया, एक सोनसाखळी, कर्णफुल व सोन्याचे बारसची ऑर्डर दिली. या दागिन्यांची संपूर्ण किमंत १३ लाख ५० हजार ८०० रुपये इतकी आहे. त्याने दोन धनादेश दिले. दागिने घेउन तो निघून गेला, मात्र त्याने दिलेले धनादेश नंतर वटलेच नाही अशी माहिती पाेलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा