शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Goa: पवित्र शवप्रदर्शनासाठीच्या सोईसुविधांचे काम येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

By किशोर कुबल | Updated: August 23, 2024 14:23 IST

Goa News: गोव्यात जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शवप्रदर्शनासाठीच्या साधन सुविधांचे काम येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असून त्यासाठी २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शवप्रदर्शन सचिवालयाची स्थापना करण्यात आली असून काल मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत एकूण तयारीचा आढावा घेतला. 

 - किशोर कुबल पणजी - गोव्यात जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शवप्रदर्शनासाठीच्या साधन सुविधांचे काम येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असून त्यासाठी २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शवप्रदर्शन सचिवालयाची स्थापना करण्यात आली असून काल मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत एकूण तयारीचा आढावा घेतला. 

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, '२१ नोव्हेंबर पासून ५ जानेवारी पर्यंत ४५ दिवस चालणार असलेल्या या पवित्र शिवप्रदर्शनासाठी देश,विदेशातून लाखो भाविक सहभागी होणार आहेत. पोप फ्रान्सिस यांनाही निमंत्रित केलेले आहे. एकूण तयारीचा आढावा मी घेतला असून आता वेगाने कामे सुरू होतील. पायाभूत सुविधांवरच २०० कोटी रुपये खर्च होईल तसेच इतर मिळून हा खर्च ४०० कोटींवरही पोहचू शकतो. केंद्र सरकारकडूनही त्यासाठी अर्थसाहाय्य मिळणार आहे.'भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोर्टल उघडले जाणार असून भाविकांनी तेथे आपली ऑनलाईन नोंदणी करता येईल. नोंदणी केलेल्यांची निवास व इतर व्यवस्था केली जाईल.'

मुख्यमंत्री म्हणाले की, 'पवित्र शव प्रदर्शन सचिवालय जुने गोवे येथून कार्यरत राहील. चालू असलेली बांधकामे तसेच इतर सोयी सुविधांचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल. जुने गोवेंतील बॉ जिझस बासिलिका व आवारातील इतर चर्चमध्ये कामे सुरू आहेत.'

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हा एक आंतरराष्ट्रीय इव्हेंट होईल. सार्वजनिक बांधकाम, महसूल तसेच इतर खात्यांना कामाला लावले आहे. पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यापासून भाजप सरकारच्या काळातच २००४ पासून या पवित्र शव प्रदर्शनाचा दर्जा वाढला. जुने गोवें भागात बगल रस्ते आले व इतर पायाभूत सुविधा निर्माण झाल्या.'

पत्रकार परिषदेस समितीवरील सहनिमंत्रक वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा ,आमदार राजेश फळदेसाई तसेच चर्चा संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस दल, उपजिल्हाधिकारी व इतरांची उच्चस्तरीय बैठक घेतली.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत