शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Goa: जुने गोवेंचे प्रसिध्द फेस्त उद्या, कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज भागातून पायी चालत येतात भाविक

By किशोर कुबल | Updated: December 3, 2023 13:17 IST

Goa News: जुने गोवें येथील जगप्रसिध्द सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उद्या सोमवारी ४ रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरे केले जाईल. त्यासाठी देशभरातून भाविकांची जुने गोवेंकडे रीघ लागली आहे.  

- किशोर कुबल  पणजी - जुने गोवें येथील जगप्रसिध्द सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उद्या सोमवारी ४ रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरे केले जाईल. त्यासाठी देशभरातून भाविकांची जुने गोवेंकडे रीघ लागली आहे.  

उद्या सोमवारी सकाळी १0.३0 वाजता मुख्य प्रार्थनेच्यावेळी  प्रमुख उत्सवमूर्ती म्हणून बडोद्याचे बिशप फादर सेबेस्त्यॅांव माश्कारेन्हस संबोधतील व भाविकांना शांती, सलोख्याचा संदेश देतील. गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप फिलीप नेरी कार्डिनल फेर्रांव हेही उपस्थित राहतील.

पहाटे ४ वाजल्यापासून प्रार्थना सुरु होतील. सकाळी ९ वाजेपर्यंत तासातासाने प्रार्थना होतील. सकाळी १0.३0 मुख्य प्रार्थनेला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, आमदार व इतर महनीय उपस्थित राहणार आहेत. या फेस्तानिमित्त गेल्या २५ नोव्हेंबरपासून ‘नोव्हेना’ (प्रार्थना) सुरु झालेल्या आहेत. ‘नोव्हेना’  नऊ दिवस चालतात. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देशातील इतर भागातून लाखो भाविकांची उपस्थिती या एकूण काळात असते. विदेशातूनही भाविक या फेस्तासाठी येतात.

शेजारी महाराष्ट्र तसेच  कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक या फेस्ताला येतात. कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज, नेसर्गी, मधवाल, देसनूर भागातून चालत यात्रेकरु ख्रिस्ती भाविक गोव्यात येतात. त्यांच्यासाठी मराठी, कन्नड तसेच विदेशी भाविकांसाठी स्पॅनिश व फ्रेंच भाषेतूनही प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ नंतरही सायंकाळपर्यंत तासातासाने प्रार्थनांचे आयोजन आहे. चर्चच्या आवारात भव्य व्यासपीठे तयार केली आहेत. एलईडी आणि भव्य स्क्रीन्सची व्यवस्था आहे. टीव्ही चॅनल्स, यु ट्युबवर मुख्य प्रार्थनेचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

फेस्तानिमित्त जुने गोवे भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. फेस्तानिमित्त भरणाय्रा फेरीसाठी जुने गोवेंत मेणबत्त्या तसेच मेणाचे अवयव विकणारे व्यावसायिक, चणें विक्रेते, खाजें विक्रेते, पारंपरिक मिठाई तसेच फर्निचर, तयार कपडे, खेळणी, पादत्राणे आदी वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. नवस फेडण्यासाठी मेणापासून तयार केलेले मानवी अवयव, मेणबत्त्यांची तसेच चणे, खाजे व अन्य पारंपरिक मिठाई लाखो रुपयांची उलाढाल होत असते. फेस्तात मुंबई तसेच अन्य ठिकाणहून आलेल्या विक्रेत्यांची संख्याही लक्षणीय आहे.

पवित्र शवदर्शन पुढील वर्षीदरम्यान, या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे युनेस्कोने जाहीर केलेले हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. ‘गोंयचो सायब’ म्हणून ओळखल्या जाणाय्रा सेंट फ्रान्सिस झेवियरचे ४00 वर्षांपूर्वीचे पार्थिव येथे जतन करुन ठेवले असून ते अद्याप जसेच्या तसे असल्याची भाविकांची भावना आहे. दर दहा वर्षानी ही पार्थिव भाविकांसाठी प्रदर्शनासाठी खुले केले जाते. २0१४ साली पवित्र शवदर्शन झाले होते. आता दहा वर्षांनी म्हणजेच पुढील वर्षी २१ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत पुन: ते होणार आहे.

टॅग्स :goaगोवा