शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात टॅक्सी व्यावसायिकांचा संप दुस-या दिवशीही सुरू, पर्यटकांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 12:47 IST

गोव्यात पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांचा संप शनिवारी सलग दुस-या दिवशीही सुरूच राहिला. पर्यटकांची यामुळे मोठी गैरसोय सुरू आहे.

पणजी : गोव्यात पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांचा संप शनिवारी सलग दुस-या दिवशीही सुरूच राहिला. पर्यटकांची यामुळे मोठी गैरसोय सुरू आहे. संपाची धग सरकारलाही जाणवू लागली आहे. संप कसा हाताळावा याविषयी सरकारही गोंधळात असल्यासारखी स्थिती आहे. हजारो पर्यटक टॅक्सी व्यावसायिक संपावर गेले आहेत. सरकार लावू पाहत असलेला डिजिटल मीटर आणि स्पीड गव्हर्नर याला टॅक्सी व्यावसायिकांचा विरोध आहे. स्पीड गव्हर्नरमुळे टॅक्सी व्यावसायिकांना 80 स्पीडपेक्षा जास्त गतीने वाहन हाकताच येणार नाही, असे टॅक्सी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

सरकारने कदंब वाहतूक महामंडळ आणि गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे बसगाड्यांची व खासगी कारगाड्यांची व्यवस्था पर्यटकांच्या वाहतुकीसाठी केली आहे पण ती पुरेशी नाही. जगभरातून हजारो पर्यटक रोज दाबोळी विमानतळावर येतात. त्यांची आता गैरसोय होऊ लागली आहे. शुक्रवारी टॅक्सी व्यावसायिकांच्या संपाचा पहिला दिवस होता. त्यामुळे पहिल्या दिवशी उत्साहाने सरकार संपाला सामोरे गेले. संप मोडून काढण्याचीही भाषा केली गेली. दुस-या दिवशी टॅक्सी व्यावसायिक संप सुरू ठेवणार नाही असे सरकारला वाटले होते पण सरकारमधीलच काही मंत्री व आमदारांनी स्वतंत्रपणे टॅक्सी व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्यामुळे टॅक्सी व्यावसायिकांचा उत्साह वाढला. सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा लागू केला पण त्याला न जुमानता दुस-या दिवशीही टॅक्सी व्यावसायिकांनी संप सुरू ठेवला. यामुळे दाबोळी विमानतळावर आणि अन्यत्र पर्यटक अडकून राहिले आहेत. त्यांची गैरसोय होऊ लागली आहे. 

वाहतूक संचालक निखील देसाई यांच्या मते दाबोळी विमानतळावर कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या आहेत. त्या बसद्वारे शुक्रवारी 2 हजार 20 पर्यटकांची व अन्य प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. एकूण 64 फे-या कदंबच्या गाड्यांमधून मारल्या गेल्या. आता विमानतळावर कदंबच्या दहा बसगाड्या ठेवण्यात आल्या आहेत. वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी टॅक्सी व्यावसायिकांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते पण ते ऐकले नाहीत. कायदा भंग करणा-यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री ढवळीकर व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला आहे. स्पीड गवर्नर हे लाववेच लागतील. कारण केंद्र सरकारचा तसा कायदा आहे. गोवा सरकार त्याविषयी काही करू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणो आहे. टॅक्सी व्यावसायिक ऐकत नसतील तर ओला व उबेरसारख्या कंपन्यांना गोव्यात पर्यटक वाहतुकीसाठी बोलवावे लागेल, असा इशारा मंत्री ढवळीकर यांनी दिला आहे. शनिवारीही पणजीतील आझाद मैदानावर हजारो टॅक्सी व्यवसायिक जमले असून ते सरकारचा निषेध करत आहेत.

टॅग्स :goaगोवाStrikeसंप