शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अभ्यासक्रमासाठी गोव्यातील विद्यार्थ्यांची ‘दापोली’लाच पसंती, गोव्याचे 17 विद्यार्थी घेताहेत कृषी शिक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 12:51 IST

कृषी अभ्यासक्रमासाठी गोव्यातील विद्यार्थ्यांची दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठालाच जास्त पसंती आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय कृषी अनुसंसाधन केंद्राकडे पाठपुरावा करुन गोवा सरकारने दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात यंदा गोमंतकीयांसाठी नऊ जागा वाढवून घेतल्या आहेत. 

पणजी : कृषी अभ्यासक्रमासाठी गोव्यातील विद्यार्थ्यांची दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठालाच जास्त पसंती आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय कृषी अनुसंसाधन केंद्राकडे पाठपुरावा करुन गोवा सरकारने दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात यंदा गोमंतकीयांसाठी नऊ जागा वाढवून घेतल्या आहेत. 

राज्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोकणातील हवामान, तेथील माती गोव्याशी मिळतीजुळती आहे. कोणी विदेशात जाऊन कृषी शिक्षण घेतले तर त्याचा कोणताही फायदा राज्याला होणार नाही याचे कारण तेथील हवामान, जमीन वेगळ्या पध्दतीची असते. कोकण कृषी विद्यापीठाचा ‘वेंगुर्ला-४’  काजू, ‘रत्ना’ हा आंबा गोव्याच्या हवामानाला मानवला आहे. गोव्यात या कलमांची मोठ्या प्रमाणात लागवड करुन पीकही घेतले जात आहे.’

 

आजवर गोव्याच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ ८ जागा दापोलीच्या या विद्यापीठात राखीव होत्या. सरदेसाई यांनी कृषी खात्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर भारतीय कृषी अनुसंसाधन केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि आणखी ९ जागा वाढवून घेतल्या. या नऊ विद्यार्थ्यांची तुकडी नुकतीच दापोलीला रवाना झाली. महाविद्यालय आधीच सुरु झाले असले तरी महिनाभराचा चुकलेला अभ्यासक्रम भरुन काढण्याची तयारी या विद्यार्र्थ्यांनी ठेवलेली आहे.  

कृषी पर्यटनाला गोव्यात बराच वाव आहे. गोमंतकीय विद्यार्थ्यांना बाहेरगांवी कृषी प्रशिक्षणासाठी आवश्यक ती सर्व मदत सरकार करील, अशी ग्वाही सरदेसाई यांनी दिली आहे. म्हणाले की, दापोलीत शिक्षणासाठी जाणाºया गोव्याच्या विद्यार्थ्यांना पूर्वी केवळ राज्य सरकारकडून महिना केवळ ३00 रुपये स्टायपेंड मिळत होती आज ती ३ हजार रुपये करण्यात आली आहे. राज्यात कृषी क्षेत्रात अधिकाधिक आधुनिकता यायला हवी. सध्या काजू, आंबा आदी फळांबाबत चांगल्या कलमांसाठी परराज्यावर अवलंबून रहावे लागते. वेंगुर्ला-४ या जातीच्या कलमामुळे काजू उत्पन्न सात ते आठ पटींनी वाढले आहे. अशा पध्दतीचे संशोधन व्हायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.