शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य चित्रपट महोत्सव १४ ऑगस्टपासून; मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:24 IST

गेल्या ३ आवृत्तींचे एकत्रित आयोजन, २०१८ पासूनच्या चित्रपटांचे प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा मनोरंजन संस्था व माहिती व प्रसिद्धी खात्याच्या सहकार्याने दि. १४ ते १७ ऑगस्ट दरम्यान राज्य चित्रपट महोत्सव होणार आहे. यंदा महोत्सवाची दहावी, अकरावी आणि बारावी आवृत्ती असेल. १४ ऑगस्ट रोजी उद्घाटन होईल तर १७ ऑगस्ट रोजी समारोप सोहळा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

ईएसजी येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी ईएसजीच्या उपाध्यक्ष आमदार डिलायला लोबो, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन चंद्र व शर्मद रायतूरकर उपस्थित होते. काही कारणांमुळे गेली तीन वर्षे चित्रपट महोत्सव झाले नाहीत. यंदा हे सर्व महोत्सव होणार आहेत. दहाव्या आवृत्तीमध्ये १० जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९, अकराव्या आवृत्तीत १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१, बाराव्या आवृत्तीत १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ यादरम्यान निर्मित झालेले चित्रपट प्रदर्शित केले जातील.

शॉर्ट फिल्म स्पर्धा

मेकॅनिझ पॅलेस आणि आयनॉक्स पणजी येथे हे सर्व चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. महोत्सवापूर्वी ४८ तासांत शॉर्ट फिल्म तयार करण्याची स्पर्धा होणार असून, चित्रपटाचा विषय महोत्सवादरम्यान देण्यात येणार आहे. यातून निवडण्यात येणारे चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात येतील. स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रपटासाठी प्रथम २५ हजार, द्वितीय २० हजार व वैयक्तीक बक्षिसे दिली जातील.

चित्रपट दोन विभागांमध्ये

महोत्सवात मराठी व कोंकणी चित्रपट दाखविण्यात येतील. या महोत्सवात फिचर फिल्म आणि नॉन फिचर असे दोन विभाग असतील. फिचर फिल्म विभागात मराठी व कोंकणी असे दोन वेगळ्या विभागातून चित्रपट दाखविले जातील. नॉन फिचर फिल्म विभागात दोन्ही भाषेचे चित्रपट प्रदर्शित होतील. इन कन्वर्सेशन सत्र, मास्टरक्लास, मार्केट चर्चासत्र, नॉलेज सिरीज व इतर सत्र होतील.

उत्कृष्ट चित्रपट ५ लाख, तर दिग्दर्शनासाठी ५० हजारांचे बक्षीस

या महोत्सवादरम्यान फिचर फिल्म विभागात पहिल्या दोन उत्कृष्ट चित्रपटांसाठी अनुक्रमे ५ लाख व ३ लाख रुपये, तर पहिल्या दोन उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी अनुक्रमे ५० हजार व ३५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, साहाय्यक अभिनेता, अभिनेत्री, बालकलाकार, कथा, पटकथा, संवाद, संगीत दिग्दर्शक अशी प्रत्येकी २५ हजारांची एकूण २१ २० बक्षिसे देण्यात येतील. नॉन फिचर फिल्म विभागातदेखील एकूण ७ बक्षिसे देण्यात येतील.

चित्रपट अनुदानासाठी ३० अर्ज : डिलायला लोबो

गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांसाठी असलेल्या चित्रपट अनुदान योजनेसाठी दि. १८ रोजीपासून अर्ज स्वीकारण्याची मुदत सुरू होत आहे. एक आठवड्यापर्यंत अर्ज स्वीकारण्यात येईल. २०१६ -२०२३ पर्यंतच्या वर्षांसाठी सुमारे ३० अर्ज संस्थेकडे आले असून, लवकरच यांची छाननी होईल. त्यानंतर मूल्यांकन समिती चित्रपटांचे मूल्यांकन करून अनुदान समितीमार्फत चित्रपटांना अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपाध्यक्षा लोबो यांनी दिली. करण्यात येतील. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत