शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Goa: गोव्यात ५ वर्षात षोडषवर्षीय मुलींमध्ये गर्भधारणेच्या प्रमाणात लक्षणीय वाढ, ८६ प्रकरणांची नोंद

By किशोर कुबल | Updated: September 26, 2023 14:39 IST

Goa News: राज्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात किशोरवयीन मुलींमध्ये गर्भधारणेचे प्रमाण वाढले असून ही चिंतेची बाब बनली आहे. पाच वर्षांत अशी ८६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

- किशोर कुबलपणजी - राज्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात किशोरवयीन मुलींमध्ये गर्भधारणेचे प्रमाण वाढले असून ही चिंतेची बाब बनली आहे.पाच वर्षांत अशी ८६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. किशोरवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थलांतरित कुटूंबांमध्ये अशी प्रकरणे लक्षणीय असू शकतात मात्र महिला आणि बाल विकास खात्याकडे या बाबतचा तपशील उपलब्ध नाही.

सरकारने किशोरवयीन गर्भधारणेच्या वाढीमागील मूळ कारणे शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. एक विशेष पीडित सहाय्य युनिट स्थापन केले आहे, जे किशोरवयीन गरोदरपणातील पीडितांना त्यांच्या सर्वांगीण कल्याणावर लक्ष केंद्रित करून त्यांना समर्थन आणि मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी समर्पित आहे.  यातून काही गोष्टी उघड होतील. म्हापसा बसस्थानक आणि मडगाव रेल्वे स्थानक तसेच इतर ठिकाणी चाइल्ड हेल्पलाइन्स ठेवण्यात आल्या आहेत ज्यायोगे पीडीतांना तात्काळ मदत मिळू शकेल.

गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने राज्यभरातील बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत.  राज्यामध्ये कार्यरत असलेल्या बाल कल्याण समित्यांना समस्यांचे निराकरण करण्याचे काम दिले आहे. किशोरवयीन गर्भधारणा रोखणे आणि हस्तक्षेप करणे आदी कामांचा यात समावेश आहे.

अल्पवयीन मुलींचे संरक्षण आणि किशोरवयीन गर्भधारणा रोखण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी  आरोग्य केंद्रांवर चर्चासत्रे, माहिती, शिक्षण आणि संवादाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीgoaगोवा