शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात 15 डिसेंबरपासून सेरेंडिपीटी कला महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 13:01 IST

भारतातील संगीत, नृत्य आणि थिएटर तसेच पाककला, शिल्पकला, व्हिज्युअल आर्टविषयक वैभवसंपन्न वारशावर प्रकाशझोत टाकण्यासाठी गोव्यात येत्या 15 डिसेंबरपासून सेरेंडिपीटी आर्ट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 

पणजी : भारतातील संगीत, नृत्य आणि थिएटर तसेच पाककला, शिल्पकला, व्हिज्युअल आर्टविषयक वैभवसंपन्न वारशावर प्रकाशझोत टाकण्यासाठी गोव्यात येत्या 15 डिसेंबरपासून सेरेंडिपीटी आर्ट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रायबंदर व पणजीसह एकूण दहा ठिकाणी हा महोत्सव पार पडेल. पणजी म्हणजे व्हायब्रंट सांस्कृतिक स्थळ आहे अशी प्रतिमा सेरेंडिपीटी महोत्सव निर्माण करत आहे. अनेक प्रदर्शने, कार्यक्रम व सादरीकरण दहा ठिकाणी केली जातील. रायबंदर येथील जुन्या गोवा मॅनेजमेन्ट संस्थेच्या इमारतीत सेरेंडिपीटी महोत्सवाचे मुख्य ठिकाण असेल. या महोत्सवाची सगळी तयारी या इमारतीत व पणजी शहरात सुरू आहे. यापूर्वी दोनवेळा हा महोत्सव गोव्यात पार पडला.

सेरेंडिपीटी आर्ट्स फाऊंडेशनची स्थापना 2016 साली सुनील कांत मुंजल यांनी केली. यंदा महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. महोत्सवाने आतापर्यंत गोव्यात कला निर्माणाच्या वातावरणाला अधिक पुष्टी दिली, असे आयोजकांचे म्हणणे आहे. सांस्कृतिक विकास, दक्षिण आशियातील उदयोन्मूख कलाकारांना पाठींबा देणो हा यंदाच्या सेरेंडिपीटी आर्ट्स महोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. देशाच्या विविध भागांतील कलेचे मिश्रण करून निर्माण केलेले प्रकल्प सेरेंडिपीटी महोत्सवस्थळी पहायला मिळतील. मुलांचा थिएटर परफॉर्मन्स, सायंकाळचे संगीत कार्यक्रम, व्हीज्युअल आर्ट व फोटोग्राफीशीनिगडीत मोठी इन्स्टॉलेशन्स ही सेरेंडिपीटी महोत्सवाची वैशिष्ट्यं असतील.

यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय सहभाग वाढलेला असेल. भारतीय संस्कृतीशी वैश्विक संवाद त्यामुळे वाढू शकेल, असे आयोजकांचे म्हणणे आहे. सेरेंडिपीटी महोत्सव म्हणजे वाव न मिळालेल्या कलाकारांसाठी व्यासपीठ आहे. देशातील विभिन्न कला-संस्कृतीचे चाहते सेरेंडिपीटी महोत्सवानिमित्ताने डिसेंबर महिन्यात गोव्यात भेट देतील.  22 डिसेंबर्पयत हा महोत्सव चालेल.

टॅग्स :goaगोवा