शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याने पहिली इलेक्ट्रीक बस वापरून परत पाठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 11:47 IST

इंजिन नाही, आवाज नाही, पेट्रोल-डिझेल नाही व प्रदूषण नाही अशा प्रकारची पहिली इलेक्ट्रिक बस गोवा सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाने तीन महिने गोव्यातील विविध रस्त्यांवर वापरली व परत हैदराबादच्या कंपनीकडे पाठवून दिली आहे.

पणजी : इंजिन नाही, आवाज नाही, पेट्रोल-डिझेल नाही व प्रदूषण नाही अशा प्रकारची पहिली इलेक्ट्रिक बस गोवा सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाने तीन महिने गोव्यातील विविध रस्त्यांवर वापरली व परत हैदराबादच्या कंपनीकडे पाठवून दिली आहे. गोव्याला इलेक्ट्रिक बस पसंत पडली. पण गोव्याच्या रस्त्यांवरून खरोखर यापुढे नव्या इलेक्ट्रिक बसगाड्या धावणार की फक्त प्रायोगिक तत्त्वावरच देखाव्यापुरती एक बस आणली गेली होती या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर तूर्त मिळत नाही.गोव्याची वाहतूक ही पर्यावरणास पूरक असावी व वाहतुकीमुळे पर्यावरणाला हानी पोहोचू नये, अशी भूमिका गोवा सरकारने इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करताना घेतली होती. गेल्या 30 जानेवारी रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते गोव्यातील ह्या पहिल्या इलेक्ट्रिक बसचे पणजीत उद्घाटन करण्यात आले होते. वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष कालरुस आल्मेदा आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री, वाहतूक मंत्री व इतरांनी मिळून पत्रकारांना सोबत घेऊन या बसगाडीतून पणजी ते बांबोळीपर्यंत फेरफटकाही मारला होता. या बसची बॅटरी चार्ज केल्यानंतर बसगाडी 250 किलोमीटर चालते. मग पुन्हा बॅटरी चार्ज करावी लागते. अशा प्रकारची बसगाडी चालवावी कशी याचे प्रशिक्षण कदंब वाहतूक महामंडळाच्या चालकांना देण्यात आले होते.गोव्यात एरव्ही बाकीच्या बसगाड्याकडून रोज 535 फे-या मारल्या जातात 18 हजार लिटर इंधन फस्त केले जाते. अशावेळी अधिकाधिक इलेक्ट्रिक बसगाड्या गोव्यातील रस्त्यांवरून धावल्या तर इंधनाचीही बचत होईल व प्रदूषणही टळेल, असा विचार सरकारने केला होता. जानेवारीत मोठ्या धूमधडाक्यात सुरू करण्यात आलेली इलेक्ट्रिक बसगाडी डोंगराळ भागातील रस्त्यांवर तसेच उंचसखल जागेवर चालते का याची पाहणी करण्यासाठी रोज ही बसगाडी विविध शहरे व गावांमधील रस्त्यांवर प्रवासी वाहतुकीसाठी कदंबकडून पाठवली जात होती. मोठीशी समस्या आली नाही.हैदराबादमधील गोल्ड स्टोन इन्फ्राटेक कंपनीने ही 2.45 कोटी रुपये खर्चाची गाडी कदंब वाहतूक महामंळाला प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी दिली होती. ही बस महामंडळाने खरेदी केली नव्हती. पण बस पसंत पडली तर अशा प्रकारच्या 10 बसगाडय़ा गोव्यातील रस्त्यांवरून धावण्यासाठी खरेदी केल्या जातील, असे सरकारने गेल्या जानेवारीत जाहीर केले होते. महामंडळाने बस चालवून ती हैदराबादच्या कंपनीकडे परत पाठवली आहे. ही बस गाडी वापरण्यासाठी किलोमीटरमागे फक्त 55 रुपयांचा देखभालीचा खर्च येतो. गोव्यातील रस्त्यांवर अशा प्रकारच्या अधिकाधिक बसगाड्या याव्यात असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर त्यावेळी म्हणाले होते. मात्र कदंब महामंडळाने पहिली-वहिली इलेक्ट्रिक बसगाडी परत पाठविल्यानंतर आता नव्या अशा प्रकारच्या बसगाड्या गोव्यात कधी धावतील ते स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :goaगोवा