शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात  पारपंरिक मेळच्यावेळी सरपंचावर प्राणघातक हल्ला, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 21:00 IST

गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील वेळळी येथे काल मंगळवारी  कार्निव्हलच्या पारंपरिक मेळच्या वेळी गावचे  सरपंच सावियो डिसिल्वा (43) याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडली.

मडगाव: गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील वेळळी येथे काल मंगळवारी  कार्निव्हलच्या पारंपरिक मेळच्या वेळी गावचे  सरपंच सावियो डिसिल्वा (43) याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडली. काल मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली. डेरिक फर्नाडीस व मॉविन फर्नाडीस या दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली.  डेरिक याच्यावरही चाकूने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले.  उपचारासाठी त्यांना गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी कुंकळळी पोलिसांनी शेन फर्नांडीस. रेंडन फर्नाडीस व अॅलरिड फर्नाडीस या तिघा भावांना कुंकळळी पोलिसांनी अटक केल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली. भारतीय दंड संहितेच्या 307,325 व 323 कलमाखाली पोलिसांनी संशयितांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. 

कुंकळळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारत खरात पुढील तपास करीत आहे. मॉविन फर्नाडीस हे तक्रारदार आहेत. मंगळवारी रात्री कार्निव्हलच्या शेवटच्या दिनानिमित्त वेळळी येथे चर्चनजिक पारंपरिक मेळचे आयोजन केले होते. सरपंच सावियो डिसिल्वा व डेरिक फर्नाडीस व मॉविन फर्नाडीस हे तेथे गेले होते. यावेळी तेथे  वाहतुकीची कोंडी होती. मूळ बाप्सोरा येथील बुधो केरकर यांनी आई आजारी असल्याने तिला डॉक्टरकडे न्यायचे असल्याने मेळ थोंडा थांबवा व कारला जाण्यासाठी वाट दया असे सांगितले. यावेळी शेन तेथे आला व त्याने केरकर यांच्या कारच्या बोनेटवर प्लास्टिक पाईप हाणला तसेच तक्रारदार तसेच सरपंच डिसिल्वा याच्याकडे हुज्जत घातली.

डिसिल्वा याने त्याची समजूत काढल्यानंतर तो पुन्हा मेळकडे गेला. त्यानंतर केरकर याच्या कारला वाट मोकळी करुन देण्यात आली. त्यानंतर रात्री आठ वाजता एक इसम सरपंच डिसिल्वा याच्याकडे आला व काही लोक मेळच्या ठिकाणी वाद घालत असल्याचे त्यांनी सांगितल्यांतर डिसिल्वा डेरिक व मॉविन याच्यांसह तेथे गेले असता काशेत गावचे लोक मेळाच्या ठिकाणी आपसात वाद घालत असल्याचे दिसून आले, वाद घालू नका शांतता राखा असे आवाहन सरपंच डिसिल्वा केले असता, शेन तेथे आला व त्याने डिसिल्वा यांच्या छातीवर चाकूने हल्ला चढविला, त्यात ते जखमी झाले. शेनने मॉविन यालाही मारहाण केली, त्याच्या रेंडन व अॅलरिड या दोघा भावाने डेरिकरलाही बेदम मारहाण केली.  त्याच्यावर चाकूने हल्लाही चढविला अशी माहिती पोलिसांनी दिली.डिसिल्वा याला मागाहून एका खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. नंतर त्याला घरी पाठवून देण्यात आले तर डेरिक याच्यावर गोमेकॉत उपचार चालू असल्याची माहिती कुंकळळी पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी