शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मी उपोषण अजून सोडलेले नाही - राजन घाटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 11:54 IST

मी उपोषण अजून सोडलेले नाही. चोवीस तासांत किंवा त्यानंतर मी योग्य तो निर्णय घेईन, असे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी मंगळवारी (27 नोव्हेंबर) लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.

ठळक मुद्देमी उपोषण अजून सोडलेले नाही. चोवीस तासांत किंवा त्यानंतर मी योग्य तो निर्णय घेईन - राजन घाटेराज्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व विरोधी काँग्रेसने आणि अनेक महिला कार्यकर्त्यांनी घाटे यांना पाठींबा दिला.घाटे यांचे आरोग्य ढासळल्याने सरकारी यंत्रणोने हस्तक्षेप केला.

पणजी - मी उपोषण अजून सोडलेले नाही. चोवीस तासांत किंवा त्यानंतर मी योग्य तो निर्णय घेईन, असे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी मंगळवारी (27 नोव्हेंबर) लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अत्यंत आजारी असल्याने प्रशासन ठप्प झाले व त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा ताबा तूर्त एखाद्या नेत्याकडे सोपविला जावा, अशी मागणी घेऊन घाटे पणजीतील आझाद मैदानावर उपोषणास बसले होते. दहा दिवस घाटे यांनी उपोषण केले. राज्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व विरोधी काँग्रेसने आणि अनेक महिला कार्यकर्त्यांनी घाटे यांना पाठींबा दिला. घाटे यांचे आरोग्य ढासळल्याने सरकारी यंत्रणोने हस्तक्षेप केला व सोमवारी रात्री घाटे यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात (गोमेकॉ) उपचारांसाठी हलविले.

रुग्णालयातून बोलताना घाटे म्हणाले, की माझ्यावर उपचार सुरू झाले आहेत पण मी अजून उपोषण थांबविलेले नाही. मी माझ्या आरोग्याचा विचार करून मी उपोषण थांबवावे अशी विनंती मला सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. मी योग्य तो निर्णय लवकरच घेईन. मी उपोषण मागे घेत नसल्याने रुग्णालयातीतील काही डॉक्टरही माझ्यावर नाराज झालेले आहेत. 

घाटे म्हणाले, की मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा म्हणून मी उपोषण केले नाही. मी फक्त मुख्यमंत्रीपदाचा ताबा दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे तुम्ही सोपवावा व प्रशासकीय काम वेगाने मार्गी लावा अशी मागणी घेऊन उपोषणास बसलो. मी कोणत्याच दबावाला बळी पडलो नाही. पंधरा लाख गोमंतकीयांचा प्रतिनिधी या नात्याने मी उपोषण केले अशी माहिती घाटे यांनी दिली. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणManohar Parrikarमनोहर पर्रीकर