शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

Goa: आरजीची हुल्लडबाजी पूर्वनियोजित, सुदिन ढवळीकर यांचा आरोप

By किशोर कुबल | Updated: March 3, 2024 13:47 IST

Goa News: आरजीची हुल्लडबाजी हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करीत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

- किशोर कुबल पणजी - आरजीची हुल्लडबाजी हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करीत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. ढवळीकर म्हणाले की , 'दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मी अकरा जणांची नावे दिली होती. मडकई, फोंडा भागात याच व्यक्ती नेहमी गोंधळ घालत असतात. बोरी प्रकल्प तसेच मलनि:सारण व इतर प्रकल्पांना याच लोकांनी खो घातला. काल मडकई येथे याच लोकांनी हंगामा केला.'

ढवळीकर म्हणाले की 'मी कोणालाही अपशब्द वापरलेले नाहीत. तुम्ही येथे का आला आहात! एवढेच मी बोट वर करून मोठ्या आवाजात विचारले. काल सकाळी पावणे सातच्या सुमारास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा मला फोन आला. आरजीचे लोक गोंधळ घालणार आहेत, अशी कल्पना त्यांनी मला दिली. त्यानंतर मी पोलीस निरीक्षकांना फोन करून फार्मागुढी येथून विश्वजीत यांना बंदोबस्तात बांदोडा येथे आणण्यास सांगितले. फार्मागुडी येथे पोचल्यावर विश्वजीत यांनी आपण परत जातो असे मला कळविले. परंतु मी त्यांना सांगितले की, कार्यक्रमासाठी एक हजार लोक जमलेले आहेत. त्यांना नाराज करू नका. तुम्ही या. पोलीस निरीक्षक व मामलेदारांकडे मी बोललेलो आहे. कोणताही गैरप्रकार होणार नाही.'माझ्या आश्वासनानंतर विश्वजीत कार्यक्रमस्थळी आले. 

'समस्या मांडायला नव्हे तर हंगामा करायला झाले होते' 'विकसित भारत' सभेत मडकई मतदारसंघातील सहा ग्रामपंचायतींचे लोक आपल्या समस्या मांडणार होते. सरपंचही उपस्थित होते. लोकांची निवेदने घेण्यासाठी गटविकास अधिकारी बसले होते. परंतु ज्यांनी हुल्लडबाजी केली त्यांच्यापैकी एकानेही गटविकास अधिकाऱ्यांना कोणतेही निवेदन दिले नाही. ते समस्या मांडायला आले नव्हते तर हंगामा करायला झाले होते. या ठिकाणी आम आदमी पक्षाचेही कार्यकर्ते होते. परंतु ते शांत बसून होते. केवळ आरजीच्याच लोकांनी गैरकृत्य केले. हे लोक समाजाला कलंक आहेत. मी काहीही गैर बोललो नसताना माझ्याबद्दल अपप्रचार केला व माझे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी कोणाच्याही गळ्याला धरायला गेलो नाही किंवा आजवर कोणालाही अपशब्द वापरलेले नाहीत. उलट विश्वेशाने माझ्याबद्दल माझ्याच मालमत्ते देऊन गैर शब्द वापरलेले आहेत. या लोकांमुळे समाजाचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप करून या लोकांना अद्दल घडवायला हवी. या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता लोकसभा निवडणुकीत मडकईत या लोकांना किती मते मिळतात हे दिसून येईलच. या लोकांवर आताच कारवाई न  केल्यास काट्याचा नायटा होईल व ते समाजालाही भारी पडणार आहे,अशी भीती ढवळीकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :goaगोवा