शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरटीआय प्रकरणात याचिका सुप्रीम कोर्टात वर्ग करण्याची गोवा राजभवनची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 19:57 IST

आरटीआय प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातील आपली आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करावी, अशी मागणी गोवा राजभवनने सर्वोच्च न्यायालयात अर्जाद्वारे  केली आहे. 

पणजी : आरटीआय प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातील आपली आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करावी, अशी मागणी गोवा राजभवनने सर्वोच्च न्यायालयात अर्जाद्वारे  केली आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सोमवारी न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर ही याचिका सुनावणीस आली असता राजभवनच्यावतीने न्यायमूर्तींना वरील माहिती देण्यात आली. समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी राजभवनच्या या कृतीस आक्षेप घेताना आरटीआय कायद्याची अंमलबजावणी टाळण्यासाठी राजभवनकडून चाललेली ही खेळी असल्याचा आरोप न्यायालयात केला. हस्तांतर याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. न्यायमूर्ती भडंग यांनी या प्रकरणावरील सुनावणी २१ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.

दरम्यान, गोवा राजभवनने सार्वजनिक माहिती अधिकारी नेमावा आणि आरटीआय कायद्याची अंमलबजावणी करावी, असा आदेश राज्य माहिती आयोगाने गेल्या १५ आॅक्टोबर रोजी दिला होता. या आदेशाला राजभवनने वरील खंडपीठात आव्हान दिले आहे. 

आयरिश यांनी १९ आॅक्टोबरला राजभवनकडे अर्ज करुन तीन गोष्टींची माहिती मागितली होती. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पदाचा ताबा घेतला त्या दिवसापासून आतापर्यंत राज्यपालांच्या दौºयावर किती खर्च आला. वरील काळात किती महनीय आणि अतिमहनीय व्यक्तींनी राजभवनला भेट दिली. त्यांच्या पाहुणचारावर अर्थात निवास, भोजन आणि प्रवासावर किती खर्च झाला तसेच वरील कालावधीत राजभवनसाठी वाहन खरेदीवर किती खर्च करण्यात आले, अशी विचारणा त्यांनी अजार्तून केली होती. परंतु अर्ज करुन ३0 दिवसांची मुदत उलटली तरी त्यांना माहिती देण्यात आलेली नाही. गोवा राजभवनकडूनच आरटीआय कायद्याचे उल्लंघन चालले आहे, असा आरोप आयरिश यांनी केला आहे. घटनेची पायमल्ली चालली आहे आणि हे अस्वीकारार्ह आहे, असे त्यानी म्हटले आहे. 

राजभवन माहिती हक्क कायद्याच्या कक्षेत येत नसल्याचा राजभवनचा दावा आहे तर आयरिश यांचे असे म्हणणे आहे की,‘ आरटीआय कायद्याच्या कलम २ (एच)अन्वये राजभवन ‘सार्वजनिक अधिकारिणी’ असूनही अद्याप तेथे सार्वजनिक माहिती अधिकारी नेमण्यात आलेला नाही. ही नियुक्ती न करणे कायद्याला धरुन नाही. देशभरातील सर्व राजभवनांमध्ये तसेच राष्ट्रपती भवनातही आरटीआय कायद्याची अंमलबजावणी केली जाते.’

टॅग्स :goaगोवा