शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : पंच मालमत्ता दाखवू लागले, लोकायुक्तांचा डोस प्रभावी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 20:00 IST

राज्यातील ग्रामपंचयातींच्या व पालिकांच्या सर्व सदस्यांनी म्हणजेच पंच आणि नगरसेवकांनी स्वत:च्या मालमत्तेबाबतची माहिती द्यायलाच हवी, असा आग्रह धरल्यानंतर व त्याबाबतच्या नोटीसा जारी केल्यानंतर अनेक पंच सदस्य स्वत:ची मालमत्ता आता अहवालाद्वारे लोकायुक्त कार्यालयाला दाखवून देऊ लागले आहेत.

पणजी : राज्यातील ग्रामपंचयातींच्या व पालिकांच्या सर्व सदस्यांनी म्हणजेच पंच आणि नगरसेवकांनी स्वत:च्या मालमत्तेबाबतची माहिती द्यायलाच हवी, असा आग्रह धरल्यानंतर व त्याबाबतच्या नोटीसा जारी केल्यानंतर अनेक पंच सदस्य स्वत:ची मालमत्ता आता अहवालाद्वारे लोकायुक्त कार्यालयाला दाखवून देऊ लागले आहेत. ब-याच पंच सदस्यांनी लोकायुक्तांना मालमत्तेची माहिती सादर केली आहे. फक्त 190 पंचायतींपैकी 60 पंचायती सद्या याविषयी थोडया सूस्त असल्याचे आढळून आले आहे.

लोकायुक्तांनी सर्व पंच सदस्य आणि नगरसेवकांना पुरेसा वेळ दिलेला आहे. गोवा लोकायुक्त कायद्यानुसार ज्याप्रमाणे आमदार व मंत्र्यांनी स्वत:च्या मालमत्तेची माहिती द्यावी लागते, त्याचप्रमाणे पंचायती, जिल्हा पंचायती व नगरपालिका आणि महापालिकेवर निवडून येणारे सदस्य यांना मालमत्तेची माहिती लोकायुक्तांना सादर करावी लागते. गेली काही वर्षे लोकायुक्तांसमोर अशी माहिती पंच सदस्य व नगरसेवकांनी सादर केली नाही. मात्र आता विद्यमान लोकायुक्त न्या. पी. के. मिश्र यांनी कडक भूमिका स्वीकारली आहे. त्यांनी कायद्यातील तरतुदींवर बोट ठेवले व सर्व 190 पंचायतींच्या पंच सदस्यांनी व नगरसेवकांनी मालमत्तेची माहिती द्यावी म्हणून नोटीस जारी केल्या.

एकूण 190 पंचायतींना लोकायुक्तांच्या कार्यालयातून पत्रे पाठविण्यात आली. कारण प्रत्येक पंच सदस्याला नोटीस किंवा पत्र पाठवायचे झाल्यास सुमारे बाराशे पंच सदस्यांचे पत्ते शोधून त्यांच्यापर्यंत पत्रे पाठविण्याची मोठी प्रक्रिया पार पाडावी लागेल व ती अडचणीची व वेळकाढू ठरेल, असा विचार करून लोकायुक्तांनी पंचायत संस्थांकडे पत्रे पाठवली. पंचायत संस्थांनी संबंधित पंच सदस्याकडे ती नोटीस पोहोचती करावी असे अपेक्षित होते.

त्यानुसार बहुतेक पंचायतींनी पंच सदस्यांकडे नोटीस तथा पत्र पोहचले केले आहे. अनेक पंच सदस्यांनी आपल्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती दिली. फक्त 60 पंचायतींकडून लोकायुक्त कार्यालयाला कोणताही प्रतिसाद आलेला नाही. म्हणजेच ग्रामपंचायतींकडे पोहोचलेली पत्रे ही संबंधित पंच सदस्यांपर्यंत पंचायतींनी पोहोचविली काही नाही ते पंचायतींनी लोकायुक्त कार्यालयास कळवलेले नाही. पत्र पोहोचल्याची पावती पंचायतींकडून लोकायुक्तांना आलेली नाही. जिल्हा पंचायत सदस्यांनी मालमत्तेविषयीची माहिती सादर केली आहे. पणजी महापालिकेवरील काही नगरसेवकांनी मात्र माहिती सादर केलेली  नाही. येत्या महिन्याभरात माहिती सादर झाली नाही तर सर्वाची नावे प्रसार माध्यमांमधून जाहीर करण्याची लोकायुक्त कार्यालयाची भूमिका असल्याचे सांगण्यात आले.