शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

२लाख ७१हजार किमंतीच्या ड्रग्सह गोवा पोलिसांनी पकडलेल्या आनंदची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By सूरज.नाईकपवार | Updated: March 10, 2024 12:03 IST

संशयिताला कोलवाळ तुरुंगात पाठवून देण्यात आले.मागच्या आठवडयात २ मार्च रोजी मडगाव पोलिसांनी मूळ मांद्रे येथील आनंद याला येथील कोकण रेल्वेस्थानकाजवळील हॉलीक्रॉस रोड येथे ताब्यात घेउन झडती घेतली असता, त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले होते.

मडगाव: २ लाख ७१ हजार रुपये किमंतीच्या अमली पदार्थासह गोव्यातील  मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या आनंद हरिश्चंद्र साळगावकर (४०) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. संशयिताची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानतंर त्याला न्यायालयात उभे केले असता, त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नंतर संशयिताला कोलवाळ तुरुंगात पाठवून देण्यात आले.मागच्या आठवडयात २ मार्च रोजी मडगाव पोलिसांनी मूळ मांद्रे येथील आनंद याला येथील कोकण रेल्वेस्थानकाजवळील हॉलीक्रॉस रोड येथे ताब्यात घेउन झडती घेतली असता, त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले होते.

यात ३.८० ग्रॅम एमडीएमए, १८ इस्टोसी टॅब्लेट, १४.६६ ग्रॅम चरस व ०.०८ ग्रॅम एलएसडी पेपर होते. कारमधून हा अमली पदार्थ घेउन तो मडगावला आला होता. पोलिसांना त्याबाबत माहिती मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर होते. पोलिसांनी त्याला नंतर पकडले होते. ती कारही जप्त केली होती.२० (ब) , (अ) व कलम २२ (ब) अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा १९८५ अंतर्गत संशयितावर गुन्हा नोंद केला होता. नंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडीही देण्यात आली होती.