शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Goa : पणजीचे नवे महापौर रोहित मोन्सेरात; उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 21:41 IST

Goa : नव्या महापौर, उपमहापौरांनी तसेच नगरसेवकांनी आज सकाळी शपथ घेतली.

ठळक मुद्देनुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत बाबुश अर्थात भाजपा पॅनलला ३0 पैकी २५ जागा मिळाल्या होत्या.

पणजी : गोव्यातील एकमेव महापालिकेच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची बिनविरोध निवड झाली. रोहित यांनी महापौरपदाचा कार्यभार हाती घेतला. रोहित हे पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांचे पुत्र आहेत. (Goa: Panaji's new mayor Rohit Monserrate; Vasant Agashikar as Deputy Mayor)

नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत बाबुश अर्थात भाजपा पॅनलला ३0 पैकी २५ जागा मिळाल्या होत्या. नव्या महापौर, उपमहापौरांनी तसेच नगरसेवकांनी आज सकाळी शपथ घेतली. आगशीकर हे दुसऱ्यांदा उपपमहापौर बनले आहेत. महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात तसेच सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यावेळी उपस्थित होते. दोघांनीही महापौर-उपमहापौर तसेच नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. 

रोहित यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे आभार मानले. शहराच्या विकासासाठी आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले. दुपारीच त्यांनी महापौर दालनाचा ताबाही घेतला.

महापालिकेत १३ महिला निवडून आल्या तरीही भाजपाने उपमहापौरपद डावलले, काँग्रेसची टीकादरम्यान, महापालिका उपमहापौरपदीही महिलांना डावलल्याबद्दल काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा बीना नाईक यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजप महिलांचा आदर करत नाही, हे यातून स्पष्ट होते असे त्यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की,‘एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या संकल्पनेची बढाई मारत आहेत, तर दुसरीकडे भाजपने पणजी महापालिकेचे उपमहापौरपदही पुरुषाला देऊन महिलांना वंचित केले आहे. 

महापालिकेवर जवळपास १३ महिला निवडून आल्या असून त्यापैकी काहीजणींनी नगरसेवक म्हणून याआधी काम के लेले आहे. असे असतानाही त्यांना डावलण्यात आले. भाजपच्या महिला नगरसेविका या अन्यायाबद्दल काहीच बोलत नाही याचे आश्चर्य वाटते, असे नाईक म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, ‘महिलांनी पुढे येऊन पदे भूषवावीत अशी भाजपची इच्छा नाही. कॉंग्रेसमध्ये असा भेदभाव कधीच  आणि तो होणारही नाही.  बलात्काराच्या आरोपींवर भाजप कारवाई करत नाही, परंतु त्यांचे उदात्तीकरण करतो, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :goaगोवा