शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : विरोधी पक्षनेते बाबु कवळेकर तपास प्रकरणात क्राईम ब्रँचचा हलगर्जीपणा न्यायालयासमोर उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 13:01 IST

गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबु कवळेकर यांच्या घरावर कथित मटका प्रकरणात घातलेल्या धाडीबद्दल गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँचने मोठा गवगवा केला असला तरी प्रत्यक्ष तपासात हलगर्जीपणाच झाल्याचे आज शुक्रवारी न्यायालयासमोर उघड झाले. 

मडगाव (गोवा) : गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबु कवळेकर यांच्या घरावर कथित मटका प्रकरणात घातलेल्या धाडीबद्दल गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँचने मोठा गवगवा केला असला तरी प्रत्यक्ष तपासात हलगर्जीपणाच झाल्याचे आज शुक्रवारी न्यायालयासमोर उघड झाले. या प्रकरणात आपल्याला अटक होईल या भीतीने कवळेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. शुक्रवारी त्याची सुनावणी होती़ मात्र, सुनावणीच्यापुर्वी पोलिसांनी सरकारी वकिलांनी केस पेपरसुध्दा देण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे सरकारी वकिलांनी बाजू मांडण्यास आपली असमर्थतता व्यक्त केली़ आणि पोलिसांचेही न्यायालयात हसे झाले.

दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश भरत देशपांडे यांनीही या घटनेची दखल घेताना बाजु मांडण्यास सरकारी वकिल हतबल झाले आहेत असे नमूद करत या अर्जावरील सुनावणी ४ आॅक्टोबर पर्यंत तहकूब केली़ आणि त्यामुळे कवळेकर यांना मिळालेला अंतरीम जामिनही ४ तारखेपर्यंत कायम राहिला.

कवळेकर यांच्यावर दाखल झालेल्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाचा तपास करणाºया भ्रष्टाचार विरोधी पथकाने १६ सप्टेंबरला कवळेकर यांच्या बेतुल येथील बंगल्यावर धाड घातली होती़ यावेळी या बंगल्याच्या आवारात असलेल्या एका खोलीत मटक्याच्या स्लिप्स् सापडल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता़ एसीबीने या संबधीची वर्धी १९ सप्टेंबरला क्राईम ब्रँचला दिली व २० सप्टेंबरला क्राईम ब्रँचने या खोलीवर पुन्हा धाड घातली़ या प्रकरणात बाबु कवळेकर व त्यांचे बंधू बाबल कवळेकर यानी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

बाबल कवळेकर यांच्यावतीने अ‍ॅड़ राजीव गोमिस यानी बाजु मांडताना पोलिसांच्या हलगर्जीपणाचा पंचनामास न्यायालयासमोर सादर केला़ एसीबीने १६ सप्टेंबरला छापा टाकला होता मग त्याची वर्धी तीन दिवसांनी क्राईम बँचला का दिली असा सवाल करताना ज्या खोलीत मटक्याच्या स्लिपस् सापडल्या आहेत असा पोलिसांचा दावा आहे त्या खोलीला कुलूप लावल्यावर ते सिल का केले नाही़ व त्याचा पंचनामाही का केला नाही असा सवाल केला़ ज्या खोलीत या स्लिपस् सापडल्या असे सांगितले जाते त्या खोलीकडे जाण्यासाठी तीन मार्ग आहेत त्यापैकी एकाच मार्गावर पोलिस पहारा ठेवण्यात आला होता़ अन्य दोन मार्ग मोकळेच होते़ या खोलीचा ४ दिवस ताबा पोलिसांकडे होता त्यामुळे या खोलीत स्लिपस् कशा आल्या? त्याचे स्पष्टीकरण पोलिसांना द्यावे लागेल़ या कथित स्लिप्सचा आपल्या अशिलाचा कुठलाही संबंध नसल्याचा दावा त्यानी केला़ या अर्जावरील सुनावणीही 4 आॅक्टोबरला तहकूब करण्यात आली.