शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा - सहा महिन्यांत स्पीड गवर्नर लावा, पर्यटक टॅक्सींसाठी अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 17:59 IST

राज्यातील पर्यटक टॅक्सींना स्पीड गवर्नर लावण्यापासून सरकारने मुळीच मोकळीक दिलेली नाही. फक्त येत्या दि. 31 जुलैर्पयत सहा महिन्यांची मुदत दिली आहे. याविषयीची अधिसूचना वाहतूक खात्याने गुरुवारी जाहीर केली.

पणजी : राज्यातील पर्यटक टॅक्सींना स्पीड गवर्नर लावण्यापासून सरकारने मुळीच मोकळीक दिलेली नाही. फक्त येत्या दि. 31 जुलैर्पयत सहा महिन्यांची मुदत दिली आहे. याविषयीची अधिसूचना वाहतूक खात्याने गुरुवारी जाहीर केली.पर्यटक टॅक्सींबाबत गोमंतकीयांच्या भावना तीव्र आहेत. जास्त प्रमाणात भाडे आकारले जात असल्याने पर्यटकांसह लोकही टॅक्सी व्यवसायिकांवर नाराज आहेत. सरकारला याची कल्पना असल्याने टॅक्सी व्यवसायिकांना स्पीड गवर्नरसाठी फक्त सहा महिन्यांची मुदत द्यावी असे ठरले. या सहा महिन्यांच्या आत जर राज्यात पुरेसे स्पीड गवर्नर उपलब्ध झाले किंवा डिलरांची संख्या वाढली तर, अगोदरच टॅक्सींना स्पीड गवर्नर लावावे लागतील, असे वाहतूक खात्याच्या अधिसूचनेत म्हटले आहे. ज्या वाहनांना चार चाके आहेत, ज्यांचे एकूण वजन 3 हजार 5क्क् पेक्षा जास्त किलो होत नाही आणि ज्यांचा वापर प्रवाशांची आणि प्रवाशांच्या सामानाची वाहतूक करण्यासाठी होतो, अशा वाहनांना 31 जुलै 2क्18 र्पयतच स्पीड गवर्नर लावण्यापासून सवलत दिली जात असल्याचे अधिसूचनेत संचालक निखिल देसाई यांनी म्हटले आहे. केंद्रीय मोटर वाहन कायद्याच्या 118 नियमानुसार स्पीड गवर्नर सार्वजनिक वाहतूक करणा:या वाहनांसाठी बंधनकारक आहे. मात्र पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांनी यापूर्वी आंदोलन केल्यामुळे आणि त्यांनी स्पीड गवर्नरला पूर्ण विरोधाची भूमिका घेतल्यामुळे सरकारने सहा महिन्यांची सवलत दिली. पर्यटक टॅक्सींची स्पीड गवर्नरपासून सुटका व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात वगैरे जाण्याचा सरकारचा मुळीच विचार नाही, असे एका अधिका:याने सांगितले. पर्यटक टॅक्सींची संख्या गोव्यात सुमारे वीस हजार आहे. यापूर्वी अन्य प्रकारच्या सुमारे साडेचार हजार टॅक्सींनी स्पीड गवर्नर लावले आहेत. स्पीड गवर्नर लावले तर आपल्याला प्रति किलोमीटर ताशी 8क् पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविता येणार नाही असे पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांचे म्हणणो आहे. स्पीड गवर्नर लावणो आपल्यासाठी रद्दच करावा अशी त्यांची मागणी आहे. मात्र अन्य राज्यांतील पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांनी जर स्पीड गवर्नर स्वीकारलेला असेल तर गोव्यातीलच व्यवसायिक आक्षेप का घेत आहेत असा प्रश्न यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनीही विचारला आहे. गेल्या आठवडय़ात सलग तीन दिवस टॅक्सी व्यवसायिकांनी संप पुकारला होता.

टॅग्स :goaगोवा