शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कर्नाटकविरुद्ध गोव्याची लवादाकडे याचिका सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 20:21 IST

कर्नाटकने यापूर्वी लवादाच्या अंतरिम आदेशाचे पालन न करता पाणी वळविण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे गोवा सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी सोमवारी लवादाकडे कर्नाटकविरुद्ध याचिका सादर केली.

पणजी  - कर्नाटकने यापूर्वी लवादाच्या अंतरिम आदेशाचे पालन न करता पाणी वळविण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे गोवा सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी सोमवारी लवादाकडे कर्नाटकविरुद्ध याचिका सादर केली. या याचिकेचाच एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रताप वेणुगोपाल यांनी गोव्याच्यावतीने लवादास सोमवारी अतिरिक्त प्रतिज्ञापत्रही सादर केले.

लवादाची मुदत एरव्ही काल सोमवारी संपत होती पण आता 19क्8 सालच्या नागरी संहिता प्रक्रियेच्या कलम 5(3) नुसार हस्तक्षेप याचिका गोव्याने सादर केल्याने लवादाला आपोआप एक वर्षाची मुदतवाढ मिळत आहे. म्हादईचे 3.9 टीएमसी फिट पाणी मलप्रभेमध्ये वळविण्यासाठी कर्नाटकला लवादाने मान्यता दिली आहे पण या पाण्याचे नियंत्रण व व्यवस्थापन स्वतंत्र अशा मंडळाने करावे असे लवादाला अपेक्षित आहे. पाणी नियंत्रण मंडळ स्थापन करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. गोव्याने कर्नाटकविरुद्ध आता लवादासमोर याचिका सादर करताना केंद्राने या मंडळाची नियुक्ती लवकर करावी या मुद्दय़ावरही भर दिला जाणार आहे, असे आत्माराम नाडकर्णी यांनी सांगितले. या 3.9 पाण्याची मालकी कर्नाटककडे राहणार नाही, ती मंडळाकडे असेल असे नाडकर्णी यांचे म्हणणो आहे.

पाणी तंटा लवादाकडे नव्या याचिकेवर कधी सुनावणी होईल ते स्पष्ट झालेले नाही. कर्नाटकला मलप्रभेमध्ये प्रत्यक्ष पाणी वळविण्यासाठी मोठे कालवे खोदावे लागतील व व्यवस्थित योजना आखावी लागेल. प्रत्यक्ष 3.9 टीएमसी फिट पाणी वळविले जाईल तेव्हा तीन वर्षाचा कालावधी गेलेला असेल असे या विषयातील काही तज्ज्ञांचे म्हणणो आहे. गोवा सरकारने याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयात कर्नाटकविरुद्ध अवमान याचिका सादर केलेली आहे.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या