शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Goa: मुरगावचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांचा राजीनामा, पुढील उपनगराध्यक्ष म्हणून ही नावं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 16:45 IST

Goa News: दक्षिण गोव्यातील मुरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांनी त्याच्या पदाचा राजीनामा मंगळवारी (दि.४) पालिका संचालक कार्यालयात सुपूर्द केला आहे.

- पंकज शेट्ये वास्को: दक्षिण गोव्यातील मुरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांनी त्याच्या पदाचा राजीनामा मंगळवारी (दि.४) पालिका संचालक कार्यालयात सुपूर्द केला आहे. सात दिवसांच्या आत अमेय चोपडेकर यांनी राजीनामा मागे घेतला नसल्यास मुरगावचा नवीन उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी पालिका संचालक कार्यालयातर्फे तारीख निश्चित करण्यात येईल. मुरगाव नगरपालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकात झालेल्या अलिखीत करारानुसार अमेय चोपडेकर यांना उपनगराध्यक्ष बनून एक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याची माहीती सूत्रांनी दिली.

मुरगावचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने आता नवीन उपनगराध्यक्ष कोण बनणार अशी चर्चा व्हायला सुरू झाली आहे. ३० मार्च २०२२ रोजी अमेय चोपडेकर यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांनी पदाचा ताबा घेतला होता. मुरगाव नगरपालिकेतील सत्ताधारी - भाजप नगरसेवकात झालेल्या अलिखीत करारानुसार अमेय चोपडेकर यांचा उपनगराध्यक्ष बनून एक वर्षाचा काळ पूर्ण झाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा देणारे पत्र पालिका संचालक कार्यालयात सुपूर्द केले आहे. सात दिवसात चोपडेकर यांनी राजीनामा मागे घेतला नसल्यास नंतर पालिका संचालक मुरगाव नगरपालिकेचा नवीन उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी उचित पावले उचलणार आहेत.

अमेय चोपडेकर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने भविष्यात मुरगाव नगरपालिकेचा नवीन उपनगराध्यक्ष कोण बनणार अशी चर्चा व्हायला सुरू झाली आहे. मुरगाव नगरपालिकेच्या सत्ताधारी गटातील नगरसेवक विनोद कीनळेकर मुरगावचे पुढचे उपनगराध्यक्ष बनणार अशी पूर्वी चर्चा व्हायची. मात्र अमेय चोपडेकर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नगरसेवक रामचंद्र कामत पुढचे उपनगराध्यक्ष बनणार अशी चर्चा व्हायला सुरू झाली आहे. भविष्यात मुरगावचा उपनगराध्यक्ष कोण बनणार ते उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतरच स्पष्ट होणार असलेतरी रामचंद्र कामत अथवा विनोद कीनळेकर यांच्यापैंकी एकाच्या गळ््यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

टॅग्स :goaगोवा