शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

Goa Municipal Election 2021: गोव्यात पालिका निवडणुकीत भाजपला यश, पण मुख्यमंत्र्यांचा उमेदवार हरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 11:26 IST

पणजी महापालिका निवडणुकीत तीसपैकी पंचवीस जागा भाजप पुरस्कृत उमेदवारांनी जिंकल्या आहेत. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली नसली तरी भाजपने पॅनल पुरस्कृत केले होते. (Goa Municipal corporation Election 2021 result)

पणजी : गोव्यातील सहा नगरपालिका आणि पणजी महापालिका यासाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केलेले उमेदवार बहुतेक ठिकाणी जिंकले आहेत. मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या साखळी मतदारसंघातील साखळी पालिकेच्या एका प्रभागातील पोटनिवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. (Goa Municipal Election 2021: BJP wins municipal elections in Goa, but loses CM candidate)

या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले होते. लाखभर मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. सोमवारी मतमोजणी पार पडली. पणजी महापालिका निवडणुकीत तीसपैकी पंचवीस जागा भाजप पुरस्कृत उमेदवारांनी जिंकल्या आहेत. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली नसली तरी भाजपने पॅनल पुरस्कृत केले होते.

वाळपई व डिचोली या दोन्ही नगरपालिकांच्या ठिकाणी भाजपला मोठे यश मिळाले आहे. काणकोण नगरपालिकेतही भाजप पुरस्कृत बहुतेक उमेदवार जिंकले आहेत. पेडणे ही पालिका उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या समर्थकांच्या ताब्यात होती पण तेथे भाजपला मोठे यश मिळाले नाही. कुंकळ्ळी पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले आहेत.

साखळी हा मुख्यमंत्री सावंत यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. तिथे साखळी या एकमेव पालिकेच्या एकाच प्रभागात पोटनिवडणूक होती. ती जागा जिंकावी म्हणून मुख्यमंत्री सावंत यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांचा उमेदवार अठरा मतांनी पराभूत झाला. हा भाजपसाठी व मुख्यमंत्री सावंत यांच्या साठीही मोठा धक्का मानला जात आहे.

कुंकळी पालिकेत 13 प्रभागांपैकी 11 प्रभागांचे निकाल जाहीर -कुंकळी पालिकेत 13 प्रभागांपैकी 11 प्रभागांचे निकाल जाहीर झाले असून 5 काँग्रेस समर्थक, 4 भाजप समर्थक तर 2 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग 4 मधून काँग्रेसचे समर्थन मिळालेल्या रुपा गावकर केवळ 1 मताने विजयी. आमदार समर्थक उमेदवार जॉर्जिना गामा यांचा प्रभाग 1 मधून पराभव झाला. तर उपनागराध्यक्ष वीरेंद्र देसाई विजयी झाले आहेत.

गोव्याच्या पालिका क्षेत्रात आपने खाते उघडले -कुडचडे काकोडा पालिकेच्या प्रभाग 3 मधून आप पुरस्कृत उमेदवार क्लेमेंतीना फेर्नांडिस विजयी. गोव्याच्या पालिका क्षेत्रात आपने खाते उघडले. 

कुडचडे काकोडा पालिकेच्या 15 पैकी 9 प्रभागांचे निकाल जाहीर -कुडचडे काकोडा पालिकेच्या 15 पैकी 9 प्रभागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यांत 7 भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी. 1 भाजप बंडखोर तर 1 आप पुरस्कृत उमेदवार विजयी झाला आहे. स्थानिक आमदार व वीज मंत्री निलेश काब्राल यांचे समर्थक असलेले माजी नगराध्यक्ष फेलिक्स फेर्नांडिस यांचा भाजप बंडखोर दामोदर भेंडे यांच्याकडून पराभव झाला.

टॅग्स :Goa Municipal Election 2021गोवा महापालिका निवडणूक २०२१Electionनिवडणूकgoaगोवा