शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : लोकायुक्तांना माहिती देण्याविषयी मंत्री, आमदारांमध्ये आळस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 12:23 IST

लोकायुक्त कार्यालयाने या विषयाचा पाठपुरावा चालवला आहे. बहुतेक मंत्री व आमदार अशा प्रकारची माहिती लोकायुक्तांना सादर करण्याविषयी आळस करतात असे आढळून येत आहे.

पणजी : 2017-18 या आर्थिक वर्षातील स्वत:च्या मालमत्तेविषयीची माहिती गोव्यातील 40 पैकी 35 आमदार व मंत्र्यांनी लोकायुक्तांना सादरच केली नाही. लोकायुक्त कार्यालयाने या विषयाचा पाठपुरावा चालवला आहे. बहुतेक मंत्री व आमदार अशा प्रकारची माहिती लोकायुक्तांना सादर करण्याविषयी आळस करतात असे आढळून येत आहे.गोवा लोकायुक्त कायद्यानुसार दरवर्षी मंत्री व आमदारांनी लोकायुक्तांना स्वत:च्या मालमत्तेविषयीची माहिती सादर करणो बंधनकारक आहे. लोकायुक्तांनी सर्व चाळीसही आमदार व मंत्र्यांना माहिती सादर करण्यास सांगितले होते. त्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत दिली गेली होती पण फक्त पाचच आमदार व मंत्र्यांनी माहिती सादर केली. बारापैकी फक्त दोनच मंत्र्यांनी स्वत:च्या मालमत्तेची माहिती सादर केली. इतरांनी माहिती लपवली असा त्याचा अर्थ होतो, असे लोकायुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

काही मंत्री व आमदारांनी आता पत्रे लिहून आम्हाला माहिती सादर करण्यास वेळ द्यावा अशी विनंती लोकायुक्त कार्यालयाला केली आहे. मात्र अशा प्रकारे मुदतवाढ देण्याची तरतूद गोवा लोकायुक्त कायद्यात नाही, असे एका अधिका-याने सांगितले. काही मंत्री व आमदार आजारी पडल्याने व ते इस्पितळात राहिल्याने लोकायुक्तांना मालमत्तेविषयी माहिती सादर करू शकले नाही हे समजता येते पण इतरांनी फक्त आळसच केला असे काही अधिका-यांचे मत बनले आहे.लोकायुक्त निवृत्त न्यायमूर्ती पी. के. मिश्र हे आता एक अहवाल तयार करून राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना सादर करणार आहेत. कोणते मंत्री व आमदार स्वत:च्या मालमत्तेविषयी लोकायुक्तांना माहिती सादर करण्यात अपयशी ठरले हे नावांसह त्या अहवालात नमूद केले जाईल. अहवाल राज्यपालांना दिल्यानंतर त्या अहवालाची एक प्रत संबंधित मंत्री व आमदारालाही पाठवली जाईल. त्यानंतर दोन महिन्यांचा अवधी आमदारांना मिळतो. त्या दोन महिन्यांतही जर त्यांनी मालमत्तेची तपशीलवार माहिती सादर केली नाही तर मात्र त्यांची नावे प्रसार माध्यमांमधून जाहीर करण्याची भूमिका लोकायुक्त घेणार आहेत, असे सुत्रंनी सांगितले. लोकायुक्तांचा अहवाल हा विधानसभेतही मांडणे गरजेचे असते. काही आमदार प्राप्ती कर खात्याला जे रिटर्न्‍स सादर करतात, त्याचीच एक प्रत काढून लोकायुक्तांना पाठवत असतात. मात्र अशी पद्धत अपेक्षित नाही. लोकायुक्तांना माहिती सादर करण्यासाठी लोकायुक्तांच्या कार्यालयाकडे असलेला अर्ज भरून द्यावा लागतो. त्या अर्जात मालमत्तेविषयीची माहिती भरून द्यावी लागते.

 

टॅग्स :goaगोवाManohar Naikमनोहर नाईक